शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुकीवर दगडफेक

17 जण जखमी: उत्सव समितीसह संतप्त नागरिकांचा मोर्चा, अपर पोलिस अधिक्षकांना निवेदन
शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुकीवर दगडफेक

धुळे । dhule प्रतिनिधी

शहरासह जिल्ह्यात शिवजयंती उत्सव शांततेत साजरा केला जात असताना शहरातील चाळीसगाव रोड युवक शिवजयंती उत्सव समितीच्या (Shiv Jayanti festival procession) मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी दगडफेक (Stone pelting)केली. त्यात 17 महिला जखमी झाल्या आहेत.त्यामुळे समस्त शिवप्रेमी नागरीकांनी आणि उत्सव समितीच्या पदाधिकार्‍यांनी आज जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. समाज कंटकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली. मिरवणुकीवर दगडफेक करुन दहशत माजवून हिंदु वस्ती रिकामी करुन त्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेण्याचा समाज कंटकांचा डाव असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याबाबत निवेदन अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, चाळीसगावरोड परिसरातील पवन नगर, मारोती नगर, विठ्ठल नगर, सप्तश्रृंगी नगर, जळगाव जनता बँक कॉलनी, मिरजकर नगर, राजेे शिव कॉलनी, सुगंध नगर, कोरके नगर,ज ीजाई हौसिंग सोसायटी, राजवाडे नगर, नरेंद्र चौक या परिसराच्यावतीने एकत्रीतपणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने चाळीसगाव रोडवरुन मिरवणुक काढण्यात आली. शंभरफुटी रस्त्याने सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मिरवणुक जात असताना चाळीसगाव रोडवरील मिरजकर नगर कॉर्नरजवळ शिफा हॉस्पिटल समोर काही समाजकंटकांनी मिरवणुकीवर दगडफेक केली. यात तीन मुलींसह 17 महिला जखमी झाल्या आहेत.

मिरवणुकीत आठशे ते हजार महिला आणि हजार ते दिड हजार पुरुष होते. समाजकंटकांचा उद्देश दहशत माजविणे आहे. नजीकच्या काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सवानिमित्त मिरवणुका काढण्यात येतील. त्यामुळे असे प्रकार घडू नये, यासाठी समाज कंटकांवर कारवाई करावी, तसेच चाळीसगाव रोड पोलिस स्टेशन समोरील 100 फुटी रस्त्यावर दररोज 30 ते 40 समाज कंटक बसून नशा पाणी करत असतात. महिलांची छेड काढतात. त्यांच्या समोर अशोभनीय कृत्य करतात.त्यामुळे दररोज रात्री साडेनऊ ते साडेअकरादरम्यान गस्ती पथकाची नेमणुक करावी, अशी मागणी भाजपा महानगरप्रमुख अनुप अग्रवाल, नगरसेवक दीपक खोेपडे, माजी उपमहापौर तथा नगरसेविका सौ.कल्याणी अंपळकर, जीवन शेंडगे, धिरज परदेशी, कुणाल रायकर, परशुभैय्या परदेशी आणि मोर्चेकर्‍यांनी केली आहे.

दगडफेकप्रकरणी अज्ञातांविरुध्द गुन्हा- शहरातील चाळीसगाव रोडवरील मिरजकर नगरजवळ शिफा हॉस्पिटल समोर शिवजयंती मिरवणुकीवर दगडफेक केल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विनायक महादू कोठावदे (वय 51 रा.पवननगर पश्चिम हुडको) यांनी चाळीसगाव रोड पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार दि.19 रोजी सायंकाळी साडेसह वाजता शिवजयंती मिरवणुक जात असताना शिफा हॉस्पिटल जवळून अज्ञात इसमांनी अज्ञात कारणावरुन मिरवणुकीवर दगडफेक केली. यात मिरवणुकीतील महिला जखमी झाली आहे. कोठावदे यांच्या फिर्यादीवरुन भादंवि 337 प्रमाणे अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.एल.बी. चौधरी करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com