अपूर्णावस्थेतील कामांसह 17 प्रकारच्या मागण्यांसाठी आ.रावलांनी दिले निवेदन

अपूर्णावस्थेतील कामांसह 17 प्रकारच्या मागण्यांसाठी आ.रावलांनी दिले निवेदन

दोंडाईचा Dondaicha । प्रतिनिधी

दोंडाईचा शहरात गेल्या 8 महिन्यांपासुन असलेल्या प्रशासकांच्या काळात (During the administrators) अनेक विकास कामांचा (Development works) बटयाबोळ झाला असून जी कामे सुरू होती ती निधी असतांना केवळ प्रशासनाच्या दिरंगाईमुळे (Incomplete due to delay) अपूर्णवस्थेत आहेत. असा आरोप करीत विविध प्रकारच्या 17 मागण्या घेवून माजी मंत्री आ.जयकुमार रावल (Former Minister MLA. Jayakumar Rawal) यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा (Morcha) काढण्यात आला. यावेळी भाजपाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी आ.रावल यांच्या समवेत निखील जाधव, नबु पिंजारी, जितेंद्र गिरासे, ईस्माईल पिंजारी, खलील बागवान, आमीन पिंजारी, नरेंद्र गिरासे, प्रदिप कांगणे, रविंद्र ईशी, छोटू श्रावण जाधव, अजय जाधव, विनोद पवार, शैलेश बोरसे, कैलास दिक्षीत, मच्छिंद्र जाधव, शशिकांत शिंदे, भरतरी ठाकूर, इरफान पिंजारी, राजू ध्नगर, पंकज चौधरी, सुभाष धनगर, मनोहर कापूरे, अनिल सिसोदिया, अहमद शेख, कृष्णा नगराळे, जमील खाटीक, भिकन बागवान जयदिप आघाव, किशनचंद दोधेजा, धाकु धनगर, देविदास पाटील, अक्षय चव्हाण, अनिल खरात, चिरंजीवी चौधरी, जयकुमार चैनानी, चतुर पाटील, चंद्रकला सिसोदिया यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मुख्याधिकारी डॉ.प्रविण निकम यांना निवेदन देवून चर्चा करण्यात आली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक त्याचे नामकरण मातृचौकाला सर्व प्रकारच्या परवानग्या असतांना देखील केवळ प्रांतधिकारी आणि पोलिस प्रशासनामुळे अडले आहे. गांवदरवाजाचे काम देखील अदयाप पालिकेकडून सुरू करण्यात आलेले नाही, मातंग समाजाला तातडीने घरकुल देण्याची गरज असतांना ते काम अद्याप प्रलंबीत आहे, रावलनगर चुडाणे रोडवरील सार्वजनिक वाचनालयाचे आणि प्रवेशव्दाराचे काम अपूर्णावस्थेत आहे.

जुन्या शहादा रोडवर रेल्वेचा उड्डाणपुलाचे काम सुरू असून त्या उडडाणपुलामुळे शहराचा मुख्य रस्ता दाबला जावून विद्रुपीकरण होणार आहे, त्यामुळे व्याराच्या धर्तीवर अंडरपास करण्यात यावा, अमरावती आणि भोगावती नदीच्या संगमावर श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल सेतूचे काम गेल्या 6 महिन्यापासुन बंद आहे, चैनी रोड वरील तिरंगा चौकाचे काम देखील प्रशासक आले त्या 8 महिन्यापासून बंद आहे. यासह शहरातील विविध मागण्या त्यांच्यासमोर ठेवण्यात आल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com