स्टेट बँक ग्राहकाची फसवणूक ; ग्राहक सेवा केंद्राच्या तिघांवर गुन्हा दाखल

स्टेट बँक ग्राहकाची फसवणूक ; ग्राहक सेवा केंद्राच्या तिघांवर गुन्हा दाखल

धुळे - प्रतिनिधी dhule

साक्री (Sakri taluka) तालुक्यातील (Pimpalner) पिंपळनेर येथील स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या (State Bank of India) ग्राहकाची 79 हजाराची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ग्राहक सेवा केंद्राच्या तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत कलुबाई राजमल चौरे (रा.कड्याळे पोस्ट बल्हाणे ता.साक्री) यांनी पिंपळनेर (police) पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार विक्की गावीत, अक्षय भामरे व शैलेष कुवर या तिघांनी हा प्रताप केला. त्यांनी भारतीय स्टेट बँक शाखेकडून अधिकृत परवाना घेवून ग्राहक सेवा केंद्र सुरू करून त्या मार्फत भारतीय स्टेट बँकेच्या पिंपळनेर शाखेच्या ग्राहक कलुबाई चौरे यांच्यासह इतरांची त्यांच्या बचत खात्यावर जमा करण्यासाठी दिलेली रक्कम त्यांच्या खात्यात जमा न करता अपहार केला. पुढील तपास एएसआय अमृतकर करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com