धुळे-चाळीसगाव पॅसेंजर सुरू करा

धुळे-चाळीसगाव पॅसेंजर सुरू करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील डेप्युटी चिफ यांना निवेदन

धुळे Dhule। प्रतिनिधी

कोरोनामुळे (Corona) तब्बल दीड वर्षापासून बंद असलेली धुळे-चाळीसगाव पॅसेंजर (Dhule-Chalisgaon Passenger) लवकरात लवकर सुरू करावी,(Should start) अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष (NCP taluka president) राजेंद्र चित्तोडकर (Rajendra Chittodkar) यांनी केली आहे. तसे निवेदन मुंबईतील पॅसेंजर ट्रेन मॅनजर विभागाचे चिफ नायक व डेप्युटी चिफ जॉर्ज इपन (Deputy Chief George Ipan) यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या मार्च-2020 पासून करोना महामारीमुळे आजतागायत चाळीसगाव ते धुळे (51115) व धुळे ते चाळीसगाव (51118) ही पॅसेंजर ट्रेन मुंबईबोगीसह बंद करण्यात आली आहे. धुळे-चाळीसगाव या रेल्वे मार्गालगत असलेल्या सुमारे शंभर गावातील जनतेची जीवनवाहिनी असलेला हा रेल्वेमार्ग आहे. यावर दररोज उदरनिर्वाह करणार्‍या जनतेसाठी हा रेल्वेमार्ग सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच धुळे ते चाळीसगाव प्रवाशांना एसटी बसचे भाडे 75 रुपये असून रेल्वेचे भाडे अत्यंत माफक 15 रुपये आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र एस.टी.महामंडळ कर्मचार्‍यांचा विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरु आहे. त्यामुळे या मार्गावर दररोज प्रवास करणार्‍या गोरगरीब जनतेचे अतोनात हाल होत आहेत.

या रेल्वेने धुळे ते चाळीसगावदरम्यान शेकडो शेतमजूर शेतीकामांसाठी व लहान सहान व्यावसायिक व्यवसायासाठी तसेच शाळा व कॉलेजने विद्यार्थी शिक्षणासाठी बसभाड्यापेक्षा अत्यंत माफक असलेल्या रेल्वे भाड्यात दररोज प्रवास करीत असतात. या गोरगरीब शेतमजूर, व्यावसायिक व विद्यार्थांची अत्यंत तातडीची गरज लक्षात घेऊन चाळीसगाव ते धुळे व धुळे ते चाळीसगाव पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याचे आदेश विभागीय रेल्वे अधिकारी भुसावळ यांना देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

ही पॅसेंजर ट्रेन सुरु करण्यासाठी ई-मेलद्वारे रेल्वे राज्यमंत्री आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भुसावळ यांना देखील निवेदन दिले होते. परंतु अद्याप ट्रेन सुरु करण्याबाबत कुठलीही हालचाल सुरु झालेली दिसून येत नाही. तरी या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन पॅसेंजर ट्रेन त्वरित सुरु करण्याचे आदेश पारित करावे, असेही निवेदनात नमुद केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com