एलबीटी ठेकेदारावरुन स्थायीत शाब्दीक वाद

सभेत सात विषयांना मंजुरी, एक विषय तहकूब, साक्री रोडवरील जोरावरअली सोसायटीत नवीन आरोग्य केंद्र बांधणार
एलबीटी ठेकेदारावरुन स्थायीत शाब्दीक वाद

धुळे Dhule। प्रतिनिधी

एलबीटी ठेकेदाराच्या (LBT contractor) टर्मीनेशनवरून सभापती शीतल नवले आणि हर्षकुमार रेलन यांच्यात शाब्दीक वाद (Literal argument) झाला. श्री. रेलन यांनी सभापती आणि प्रशासनला धारेवर धरले. तर सभापती नवले यांनी देखील निविदा (Tender) काढली म्हणजेच ठेकेदार आपोआप टर्मीनेट होईल असे रेलन यांना सुनावले.

महापालिकेच्या (Municipal Corporation) स्थायी समितीची सभा (Standing Committee Meeting) सभापती शीतल नवले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगर सचिव मनोज वाघ व सदस्य उपस्थित होते. सभेत सात विषयांना मंजुरी देण्यात आली. विषय क्र. 83 हा मनपा क्षेत्रातील स.न. 444/1 अ येथील शासकीय जमिनीवर संरक्षण भिंती बांधण्याच्या कामाच्या निविदा दराच्या विषयाला नगरसेविका प्रतिभा चौधरी यांनी हरकत घेतली. ज्या जागेवर संरक्षण भिंत बांधली जाणार आहे. तेथे अतिक्रमण आहे का? नगररचना विभागाचा अभिप्राय घेतला आहे का? असे प्रश्न उपस्थित करून कार्यालयीन टिप्पणीमध्ये सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर सभापतींनी विषय तहकूब केला.

हर्षकुमार रेलन यांनी एलबीटी ठेकेदाराचा मुद्दा उपस्थित केला. गेल्या दहा बारा सभांमधून एकाच विषयावर चर्चा होत असतांना ठेकेदाराला पाठीशी का घातले जात आहे. एलबीटीच्या मुद्यावर दालनात बैठक घेवू असे सभापती सांगतात, मात्र बैठक बोलवत नाहीत. बंद दाराआड चर्चा नेमकी काय होते. एलबीटी ठेकेदाराचे टर्मीनेशन का नाही, असे प्रश्न उपस्थित केले. त्यावर सभापतींनी तीन दिवसांपुर्वीच आयुक्तांसह इतर अधिकारी आणि रेलन यांच्यासह बैठक घेतली.

मात्र बैठक घेतली नाही, असे तुम्ही कसे म्हणता, असा प्रश्नच सभापतींनी रेलन यांना विचारला. बैठक झाली पण रिझल्ट का नाही, असा सवाल रेलन यांनी विचारताच अहवाल आला नाही, हर्षकुमार रेलन यांनी एलबीटी ठेकेदाराचा मुद्दा उपस्थित केला. गेल्या दहा बारा सभांमधून एकाच विषयावर चर्चा होत असतांना ठेकेदाराला पाठीशी का घातले जात आहे. एलबीटीच्या मुद्यावर दालनात बैठक घेवू असे सभापती सांगतात, मात्र बोलवत नाहीत. बंद दाराआड चर्चा नेमकी काय होते.

एलबीटी ठेकेदाराचे टर्मीनेशन का नाही, असे प्रश्न उपस्थित केले. त्यावर सभापतींनी तीन दिवसांपुर्वीच आयुक्तांसह इतर अधिकारी आणि रेलन यांच्यासह बैठक घेतली. बैठक घेतली नाही, असे तुम्ही कसे म्हणता, असा प्रश्नच सभापतींनी रेलन यांना विचारला. बैठक झाली पण रिझल्ट का नाही, असा सवाल रेलन यांनी विचारताच अहवाल आला नाही, असे स्पष्टीकरण सभापतींनी दिले.

आम्हाला सांगून टाका ठेका सुरू राहिल. म्हणजेच आम्ही आमचा वेगळा मार्ग निवडू, असा इशाराचा रेलन यांनी दिला. पैसे मिळाले नाही म्हणून ठेकेदार पळून जातात. येथे मात्र पैसे न मिळताही ठेकदार ठाण मांडून कसा, असा सवालही त्यांनी केला. सभापती नवले म्हणाले की, आयुक्तांबरोबरच्या बैठकीत सदर ठेकेदाराला मुदतवाढ देणे, तीन-चार एजन्सीज निवडून पाच सहा महिन्यात एलबीटीचे काम संपविणे या विषयावर चर्चा झाली होती. त्यात आताच्या ठेकेदाराला मुदतवाढ आपणहून नाकारली. त्यामुळे नवीन ठेकेदाराच्या नियुक्तीबाबत निविदा काढल्यानंतर आताचा ठेकेदार आपोआपच टर्मीनेट होईल, असे स्पष्ट केले. मात्र या उत्तराला रेलन यांचे समाधान झाले नाही. असे स्पष्टीकरण सभापतींनी दिले. आम्हाला सांगून टाका ठेका सुरू राहील. म्हणजेच आम्ही आमचा वेगळा मार्ग निवडू, असा इशाराचा रेलन यांनी दिला. पैसे मिळाले नाही म्हणून ठेकेदार पळून जातात. येथे मात्र पैसे न मिळताही ठेकदार ठाण मांडून कसा, असा सवालही त्यांनी केला.

सभापती नवले म्हणाले की, आयुक्तांबरोबरच्या बैठकीत सदर ठेकेदाराला मुदतवाढ देणे, तीन-चार एजन्सीज निवडून पाच सहा महिन्यात एलबीटीचे काम संपविणे या विषयावर चर्चा झाली होती. त्यात आताच्या ठेकेदाराला मुदतवाढ आपणहून नाकारली. त्यामुळे नवीन ठेकेदाराच्या नियुक्तीबाबत निविदा काढल्यानंतर आताचा ठेकेदार आपोआपच टर्मीनेट होईल, असे स्पष्ट केले. मात्र या उत्तराला रेलन यांचे समाधान झाले नाही. साक्री रोडवरील जोरावरअली सोसायटी तसेच वरखेडी येथे राष्ट्रीय शहरी अभियानातंर्गत नवीन आरोग्य केंद्र बांधण्याच्या निविदा दराच्या विषयाला मंजुरी देण्यात आली.

मानधनावरील स्वच्छता निरीक्षकांना सहा महिने मुदतवाढ देण्याचा विषयही मंजुर करण्यात आला. महापालिकेचे 11 अ‍ॅलोपॅथी दवाखाने, तीन सुतिकागृह, एक कुटुंब कल्याण केंद्र व एक नागरी आरोग्य केंद्रासाठी सन 2022-23 या वर्षासाठी लागणारी औषध खरेदीसाठी शेवटची खरेदी किंमत दराप्रमाणे 29 लाख 94 हजार 302 रूपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. जिल्हा नियोजनअंतर्गत विशाल इस्टेट आणि सर्व्हे नं. 35 हनुमान नगर भागातील मोकळ्या जागेवर संरक्षण भिंत बांधण्याच्या विषयालाही मंजुरी देण्यात आली. पारोळा रोडवरील असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा देखील रेलन यांनी मांडला.

नरेश चौधरी यांनी कुमारनगर ते नकाणे रोड या पांझरा नदी पुलावरील खड्डे पावसाळ्यापुर्वीच बुजवावे, अशी मागणी केली. किरण अहिरराव यांनी हद्दवाढ गावातील मालमत्ता धारकांना आलेल्या अव्वाच्या सव्वा कर आकारणीचा मुद्दा उपस्थित केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com