धुळ्यात समूह राष्ट्रगीत गायनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

धुळ्यात समूह राष्ट्रगीत गायनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

धुळे - प्रतिनिधी dhule

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी (Amrit Mahotsa) वर्षानिमित्त समूह राष्ट्रगीत (national anthem) गायनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आज सकाळी 11 वाजता एकाचवेळी जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्थांमध्ये समुह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. त्यात खाजगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी देखील सहभाग घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector's Office) आज सकाळी राष्ट्रगीत गायनाचा सामूहिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी जलज शर्मा (Collector Jalaj Sharma), निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड (Deputy Collector Sanjay Gaikwad), जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, उपजिल्हाधिकारी डॉ.अरविंद अंतुर्लीकर (निवडणूक), सुरेखा चव्हाण (भूसंपादन), गोविंद दाणेज (रोहयो) यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच महापालिकेतही समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले.

महापालिकेमार्फत 10.45 वाजता बिगुल वाजवून इशाराही देण्यात आला होता. यावेळी आयुक्त देविदास टेकाळे उपमहापौर अनिल नागमोते, स्थायी समिती सभापती शितल नवले आदींसह सर्व अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक उपस्थित होते. जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयातही समुह राष्ट्रगीत गायक करण्यात आले. त्यात पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव व सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com