
धुळे ।Dhule प्रतिनिधी
जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस (good rain) सुरु असून शेतकरी वर्ग सुखावला (peasantry was happy) आहे. यंदा चार लाख 16 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या (sow) अपेक्षित होत्या. त्यापैकी आतापर्यंत 3 लाख 87 हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच उद्दिष्टाच्या 93 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक कापसाची लागवड (Most cotton cultivation) झाली आहे. शेतकरी आता निंदणी, कोळपणी, खत देण्याच्या कामात व्यस्त दिसून येत आहे.
जिल्ह्यात यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली. मात्र सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. आताही पावसाची रिपरीप सुरूच आहे. आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत 131 टक्के पाऊस झाला आहे. यामुळे पेरण्या देखील पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात चार लाख 16 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या अपेक्षित होत्या. त्यापैकी आतापर्यंत 3 लाख 87 हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच उद्दिष्टाच्या 93 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.
सध्या जिल्ह्यातील मुग, उडीद सारखे कडधान्याचे पिके फुलोरा अवस्थेत आले आहेत. तर ज्वारी, बाजरी, मका सारखे पिके वाढीच्या स्थितीत आहेत. आता पर्यंत झालेल्या पेरण्यांमध्ये सर्वाधिक क्षेत्रात कापूस लागवड झाली आहे. त्यात देखील बागायती कापूस दीड ते दोन महिन्यांचे झाले आहेत.
अशा कापूस पिकाची कोळपणी, फवारणी करून खत देण्याचे काम सुरु आहे. तर जिरायत क्षेत्रातील देखील कापूस लागवड पूर्ण झालेली आहे. कापूस वाढीच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे खताची पहिली मात्रा देण्यात येत आहे. काही ठिकाणी पावसाने विश्राम घेतला आहे. तर कुठे रिपरिप सुरू आहे. चांगला पाऊस झाल्यामुळे पिकांची स्थितीही चांगली आहे. असाच पाऊस राहिल्यास यंदा चांगले उत्पादन येण्याची शक्यता शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.