वृध्द पित्याची हत्या करणार्‍या पुत्राला अटक

वृध्द पित्याची हत्या करणार्‍या पुत्राला अटक

धुळे । Dhule। प्रतिनिधी

शिरपूर तालुक्यातील कढईपाणी, उर्मदा येथे क्षुल्लक कारणावरून (trivial reasons) वृध्द पित्याची हत्या (Murder of an old father) करणार्‍या पुत्राला (Son) पोलिसांनी आपसिंगपाडा येथून अटक (Arrested) केली.

मुलगा आणि सुनेचे (son and daughter-in-law) भांडण (settle the quarrel)सोडविण्यासाठी गेले असता त्याचा राग येवून सुकराम पेमा पावरा याने तिक्ष्ण हत्याराने पेमा हिरा पावरा (वय 72) यांच्या पाठीवर वार करुन त्यांना खून (Murder) केला. ही घटना दि.16 जुन रोजी सायंकाळी घडली.

घटनेनंतर सुकराम हा फरार झाला होता. त्यांच्यावर भादंवि कलम 302 प्रमाणे शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा शोध सुरू असतांना तो आपसिंगपाडा येथे त्याच्या शालकाकडे असल्याची गुप्त माहिती सपोनि सुरेश शिरसाठ यांना मिळाली.

त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संजय सुर्यवंशी, पोना प्रविण धनगर, पोकॉ संतोष पाटील, मुकेश पावरा, रोहिदास पावरा, कृष्णा पावरा यांच्या पथकाने आपसिंगपाडा गाठत तेथून सुकराम पावरा याला अटक केली. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि सुरेश शिरसाठ हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com