कर्तव्यावर जात असलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू

धुळे तालुक्यातील सौंदाणे गावावर शोककळा
कर्तव्यावर जात असलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

तालुक्यातील सौंदाणे येथील भारतीय सैन्य दलातील जवानाचा दिल्लीनजीक अपघातात मृत्यू झाला. सुटी संपल्याने ते कर्तव्यावर जात असतांना ही दुर्देवी घटना घडली. त्याच्या निधनाचे वृत्त कळताच गावावर शोककळा पसरली आहे.

सौंदाणे (ता.धुळे) येथील घनश्याम कपुरचंद बागुल (वय 28) हा तरुण भारतीय सैन्य दलात सेवा बजावत होता. पंधरा दिवसाच्या सुटीवर सौंदाणे गावी आला होता. सुटी संपल्याने बागुल हे कर्तव्यावर जाण्यासाठी निघाले.

त्यांनी दिल्लीपर्यंतचा प्रवास विमानाने केला. दिल्लीपासून पुढे जातांना त्यांच्यासोबत तीन जवान होते.त्यामुळे सैन्य दलाच्या कॅम्पवर जाण्यासाठी भाडेतत्वावर कार घेतली होती. कारने फिरोजपूर जवळील सैन्यदलाच्या कॅम्पवर जात असताना दिल्लीपासून 35 कि.मी.अंतरावर त्यांच्या कारचे चाक पंक्चर झाले.

तेव्हा ते पाहण्यासाठी उतरलेल्या घनश्याम बागुल यांना भरधाव ट्रॉलाने जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत कळताच सौंदाणे गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान घनश्याम बागुल यांना 17 महिन्याची मुलगी आहे. त्यांचे पार्थिव रात्री अथवा उद्या सकाळी त्यांच्या गावी आणले जाणार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com