तर एस.टी.कर्मचार्‍यांची स्थिती मिल कामगारासारखी होईल

धुळयात खा. हुसैन दलवाई यांनी व्यक्त केली भिती
तर एस.टी.कर्मचार्‍यांची स्थिती मिल कामगारासारखी होईल

धुळे । Dhule । प्रतिनिधी

एस.टी.बसने (ST bus) संपुर्ण महाराष्ट्र जोडण्याचे काम केले आहे. मात्र गेल्या पाच महिन्यापासून ज्या पध्दतीने एस.टी.कर्मचार्‍यांचा संप (Strike of ST employees) सुरू आहे. त्यामागे खासगीकरणाचा (privatization) उद्देश असल्याचे संशय आहे. वास्तविक एस.टी.चे सरकारीकरण (Governmentization of ST) करण्याची मागणीच चुकीची आहे. जर एसटीचे सरकारीकरणच करायचे होते तर मग देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काळात का केले नाही, असा सवाल करत जर संप (Strike) अशाच पध्दतीने सुरू राहिल्यास एस.टी.कर्मचार्‍यांची स्थिती ही मिल कामगारासारखी (Like a mill worker) होईल, अशी भिती आज माजी खासदार तथा मौलाना आझाद मंचाचे (Maulana Azad Manch) हुसैन दलवाई (Hussain Dalwai) यांनी धुळ्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

याप्रसंगी रमेश दाणे, नाजनिन शेख, कॉग्रेसचे प्रकाश सोनवणे आदी उपस्थित होते. एका कार्यक्रमानिमित्त हुसैन दलवाई हे धुळ्यात आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. प्रंसगी त्यांनी देशातील एकूण स्थितीबाबत आपली मते मांडली.

हिजाबच्या (Hijab) मुद्यावर ते म्हणाले की, स्वःसंरक्षणासाठी हिजाब वापरणे योग्य आहे. मात्र शैक्षणिक संस्थेत ते चालत नसेल त्यासाठी आग्रह धरणे चुकीचे आहे. कारण शिक्षण हेच खर्‍या अर्थाने हिजाब असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. तसेच नरेंद्र मोदी Narendra Modi यांचे सरकार आल्यापासून देशाची आर्थिक व्यवस्था डबघाईला (financial system is in shambles) आली आहे. सरकारी उद्योगाचे खासगीकरण करणे, सरकारी नोकरीचे प्रमाण कमी करणे असे धोरण हे देशासाठी घातक ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

एसटी कर्मचार्‍यांबरोबर तडजोडी करण्याबाबतही राज्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार कमी पडल्याचे त्यांनी मान्य केले. महामंडळ बरखास्त (Corporation dismissed) करून ते खाजगी उद्योगाच्या (private industry) हातात सोपविण्याचे यामागे षडयंत्र आहे. त्यामुळे भविष्यात एस.टी.कर्मचार्‍यांची स्थिती ही मिल कामगाराप्रमाणे (Like a mill worker) होईल अशीही भिती हुसेन दलवाई यांनी व्यक्त केली.

आज देशात काही प्रश्न निर्माण करून समाजात फुट पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यातही एकाच विशिष्ट समाजाविरोधात वातावरण (Anti-social atmosphere) तयार केले जात आहे. मात्र या समाजात काही चुकीच्या गोष्टी असतील तर त्याबाबत चर्चा झाली पाहिजे. इतरही समाजातील चुकीच्या गोष्टीवर चर्चा होणे गरजेचे आहे. इतर देशातील मुस्लीम समाजापेक्षा भारतातील मुस्लीम समाज हा सुरक्षित आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर देशातील स्थितीबाबतही चिंता व्यक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com