तर देश गृहयुध्दाच्या दिशेने....

तर देश गृहयुध्दाच्या दिशेने....

धुळे dhule। प्रतिनिधी

सर्वांना एकत्र करा नाही तर देश गृहयुध्दाच्या (Country of civil war) दिशेने जावू शकतो असे प्रतिपादन दिल्ली येथील जेएनयू विद्यापीठाचे (JNU University) डॉ. शरद बाविस्कर (Dr. Sharad Baviskar) यांनी केले.

डॉ. आंबेडकर अकॅडमी व फुले शाहू आंबेडकर संबोधी प्रतिष्ठानतर्फे आयोजित डॉ. आंबेडकर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफतांना तत्त्वज्ञ डॉ आंबेडकर या विषयावर डॉ. बाविस्कर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी पाटील हे होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक मा. शं. महेशगौरी, प्राचार्य बाबा हातेकर, प्रा. अनिल दामोदर, प्राचार्य डॉ.सुरेंद्र मोरे, डॉ. दीपक शेजवळ, डॉ. बाळासाहेब गायकवाड, अ‍ॅड. आनंद जगदेव व डॉ. संजीव पगारे आदी उपस्थित होते.

महेश गौरी यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले.

जातीप्रथेचे पूर्णपणे उच्चाटन जर झाले नाही तर भारतातील गणराज्य - लोकशाहीचेच उच्चाटन होण्याचा धोका आहे; ही बाब सर्वांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. देशातील समग्र क्रांतीसाठी शिक्षण आणि प्रबोधनाचाच आधार घ्यावा लागेल. त्यासाठी केवळ एका जातीचा आधार घेऊन हा देश बदलणार नाही. तर दूरगामी विचार करून सर्वांना एकत्र केले नाही तर देशाची वाटचाल गृहयुद्धाच्या दिशेने होईल असा इशाराही डॉ. बाविस्कर यांनी दिला.

प्रारंभी प्रा. बाबा हातेकर यांनी प्रास्ताविकातून व्याख्यानमालेच्या निर्मिती आणि इतिहासावर प्रकाशझोत टाकला. महेश गौरी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

आज देशाची अंतर्गत परिस्थिती बघता नव्याने महात्मा फुले नि बाबासाहेब आंबेडकर समजून घेण्याची, त्यांचे विचार समाजाला समजावण्याची खरी गरज आहे. महापुरुषांना वेगवेगळ्या कप्प्यात न विभागता त्यांच्या नावाचा आधार घेऊन विषपेरणी करणार्‍यांना उघड करणे गरजेचे आहे. आज केवळ शिक्षणाचीच नव्हे तर सर्वच क्षेत्रांची परिस्थिती वाईट बनली आहे. त्यामुळे बुद्धिवाद्यांनी समाजाला नवा पर्याय देण्याची गरज असल्याचे यावेळी डॉ. के. बी. पाटील यांनी नमूद केले.

परिचय डॉ. सतीश निकम आणि सूत्रसंचालन डॉ. संजय धोडरे यांनी केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com