प्रवाशी बॅगांमधून गांजाची तस्करी : तरूणाला बेड्या

देवपूर पोलिसांची कारवाई: 10 किलो माल जप्त
प्रवाशी बॅगांमधून गांजाची तस्करी : तरूणाला बेड्या

धुळे । dhule प्रतिनिधी

शहरातील पांझरा चौपाटीवर बॅगेत गांजा (ganja) घेवून फिरणार्‍या तरूणास (Youth) पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडे दहा किलो गांजा मिळून आला. देवपूर पोलिसांनी ही कारवाई केली.

दोंडाईचाहून पुण्याच्या दिशेने एक जण गांजा घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार देवपूर पोलिसांनी पांझरा नदी किनारी असलेल्या चौपाटी परिसरात सापळा रचला. संशयीत तरूण दिसताच त्याला पकडले. त्यांच्याकडील दोन बॅगा उघडून पाहिल्या असता त्यात 10 किलो गांजाचा आढळून आला. याबाबत देवपूर पोलिसांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी यांना माहिती देताच तेही घटनास्थळी दाखल झाले.

तसेच राज्य उत्पादन शुल्क व महसुल विभागाच्या अधिकार्‍यांसमक्ष अंमलीपदार्थाचे वजन करण्यात आले. पकडण्यात आलेल्या तरूणाने त्याचे नाव सूर्यकांत दिलीप तमाईचेकर (रा.दोंडाईचा) असे सांगितले. त्याच्यासोबत इतर साथीदार असल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी संशयीत आरोपीवर देवपूर पोलिस ठाण्यात गुन्ह्या दाखल करण्यात आला आहे. तसेच तो हा गांजा कुठून कोणाकडे नेत होता, याचाही पोलिस तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलिस निरीक्षक मोतीराम निकम, उपनिरीक्षक राजेंद्र माळी, उपनिरीक्षक राजेश इंदवे, उपनिरीक्षक रोहिणी जाधव, पोहेकॉ मिलिंद सोनवणे, जब्बार शेख, योगेश कचवे, पोना शशिकांत देवरे, मुकेश वाघ, किरण सावळे, चालक भरत चौधरी यांनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com