लक्झरीतून होणारी गांजाची तस्करी रोखली

एलसीबीची कारवाई; 30 हजारांचा गांजा जप्त, तरुण ताब्यात
लक्झरीतून होणारी गांजाची तस्करी रोखली

धुळे Dhule । प्रतिनिधी

लक्झरीतून (luxury) होणारी गांजाची तस्करी (smuggling of ganja) एलसीबीच्या पथकाने (LCB team) कारवाई करत रोखली. तालुक्यातील नगाव शिवारात सापळा रचत लक्झरीला थांबवून तिची तपासणी करण्यात आली. त्यात एका तरूणाकडे (young man) पाच किलो ओला व सुका गांजा (Five kilos of wet and dry ganja) मिळून आला. त्याला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून गांजासह मोबाईल असा एकुण 34 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

इंदूरहून गोव्याला जाणार्‍या एम.पी.09/एफ.ए.9153 क्रमांकाच्या लक्झरीतून गांजा तस्करी होत असल्याची गुप्त माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना काल मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रात्री नगाव शिवारातील हॉटेल अमोलजवळ सापळा लावला. रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास संशयीत लक्झरी बस समोर येताना दिसताच तिला थांबविण्यात आले. त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता एका प्लास्टिकच्या पिशवीत तब्बल 4 किलो 895 ग्रॅम वजनाचा गांजा आढळला.

बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत 29 हजार 130 रुपये इतकी आहे. याप्रकरणी गांजा तस्करी करणार्‍या निरज ललित कथुरीया (वय 25 रा.वाबळे कॉलनी, फकीरवाड, अहमदनगर) या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. 29 हजारांचा गांजा व पाच हजारांचा मोबाईल असा एकुण 34 हजार 130 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्या विरोधात पोकॉ. कमलेश सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी निरीक्षक हेमंत पाटील, पोसई बाळासाहेब सूर्यवंशी, पोहेकॉ. श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, प्रकाश सोनार, संदीप सरग, पोना. योगेश चव्हाण, कमलेश सूर्यवंशी, राहूल गिरी, सागर शिर्के, गुलाब पाटील यांच्या पथकाने केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com