सहा लाखांचे दागिने लंपास

सहा लाखांचे दागिने लंपास

धुळे । dhule

शहरातील मुंबई-आग्रा (Mumbai-Agra) महामार्गावरील अवधान औद्योगिक वसाहतीतील हॉटेलमध्ये असलेल्या साखरपुडा व संगीत सोहळ्याच्या कार्यक्रमातून वरपक्षाचेच रोकडसह सहा लाखांचे दागिने (Jewelry) चोरट्याने लंपास केले. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत व्यापारी अभिषेक शंकरलाल अग्रवाल (वय 33 रा. अग्रवाल नगर, धुळे) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा लहान भाऊ आदित्य याचे दि. 2 मे रोजी हॉटेल टॉपलाईनमध्ये लग्न झाले. लग्न सोहळ्यापुर्वी दि. 1 रोजी सायंकाळी साखरपुडा व संगीताचा कार्यक्रम होता.

या कार्यक्रमासाठी ते लॉन्समध्ये आले. तेव्हा त्यांच्या आईने मुलीला देण्यासाठी आणलेली दागिने असलेली बॅग आई बसलेल्या सोफासेटवर तिच्या बाजुला ठेवली. सात ते साडेआठ वाजेदरम्यान ती बॅगच कोणीतरी चोरून नेली.

त्यात 1 लाख 65 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दोन तोळे वजनाचे पॅडलला डायमंड लावलेले मंगळसुत्र, 50 हजारांची एक तोळ्याची सोन्याची अंगठी, 40 हजारांचे 8 ग्रॅमचे कानातील टॉप्स, 42 हजारांचे चांदीचे 40 शिक्के व 2 लाख 90 हजार रुपये रोख असा एकुण 5 लाख 87 हजारांचा ऐवज होता. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला असून तपास उपनिरीक्षक सुर्यवंशी हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.