बहिणीची भेट अपूर्णच, अपघातात भावाचा मृत्यू

बहिणीची भेट अपूर्णच, अपघातात भावाचा मृत्यू

धुळे । Dhule

तालुक्यातील आनंदखेडा येथील बहिणीस भेटण्यासाठी निघालेल्या दुचाकीस्वार तरूणाला नेरनजीकच भरधाव रूग्णवाहिकेने जबर धडक दिली. त्यात तरूण ठार झाला. त्यामुळे भावाची बहिणीशी भेट अपुर्णच राहिली. काल दुपारी हा अपघात झाला. याप्रकरणी रूग्णवाहिका चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पावसामुळे रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था या अपघातांना आमंत्रण देत आहे.

शिवाजी रामसिंग भवरे (वय 29 रा. आयणे ता. साक्री) असे मयत तरूणाचे नाव आहे. तो दुचाकीने (क्र. एमएच 41 एम 2439) मच्छींद्र रावण सोनवणे (वय 32) या सोबत घेवून काल दुपारी बारा वाजेच्या सुमारास आनंदखेडा येथे बहिणीला भेटण्यासाठी निघाला होता. त्यादरम्यान सुरत-नागपूर महामार्गावरील नेर गावाजवळ मागे बसलेला मच्छींद्र हा काही साहित्य घेण्यासाठी खाली उतरला.

तर दुचाकीचालक शिवाजी हा पुढे जात असतांना मंजुश्री पेट्रोलपंपाजवळ त्याला साक्रीकडून धुळ्याकडे येणार्‍या भरधाव रूग्णवाहिकेने (क्र. एमएच 18 बीजी 7359) मागून जोरदार धडक दिली. त्यात शिवाजी हा गंभीर जखमी झाला. त्याला पाहताच मच्छिंद मदतीसाठी धावून आला. त्याने लोकांच्या मदतीने त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून शिवाजी भवरे यास मृत घोषित केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com