श्रीक्षेत्र कन्हैयालाल महाराजांचा यात्रोत्सव यंदाही रद्द

दर्शनासाठी लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक - एसडीपीओ
श्रीक्षेत्र कन्हैयालाल महाराजांचा यात्रोत्सव यंदाही रद्द

पिंपळनेर - प्रतिनिधी dhule

श्रीक्षेत्र कन्हैयालाल महाराज मंदिर, आमळी येथील यात्रोत्सव या वर्षीही बंद राहणार आहे. मात्र शासकीय नियमांचे पालन करत भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश मिळणार आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाईल, असे उपविभागीय अधिकारी मैराळे यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात आयोजित बैठकीत सांगितले.

साक्री तालुक्यातील आंमळी येथील जागृत देवस्थान श्रीक्षेत्र कन्हैलाल महाराजांचा यात्रोत्सव कार्तिक एकादशीला (खोपडी एकादशी) असतो. मात्र कोरोनाचे संकट अदयाप संपलेले नसल्याने उपविभागीय अधिकारी मैराळे यांनी कन्हैयालाल महाराज मंदिर ट्रस्ट व आमळी ग्रामपंचायत सरपंच यांचेसह सर्व सदस्यांची पिंपळनेर पोलिस ठाण्यात बैठक घेतली.

यावेळी अप्पर तहसीलदार विनायक थविल, एपीआय. सचिन साळुंखे , आंमळी येथील लोकनियुक्त सरपंच हिनाताई बोरसे ,यात्रा समितीचे अध्यक्ष धर्मेंद्र बोरसे, देवस्थानचे विश्वस्त व मंदिराचे मुख्य पुजारी किरण दहीते, कन्हैयालाल दहिते, सुनील खरवंटे,सह यात्रोत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी मैराळे यांनी सांगितले की, कोरोनाचा प्रादुर्भाव, वरिष्ठांच्या आदेशाने यावर्षी ही कन्हैयालाल महाराज यात्रोत्सव बंद राहील. केवळ मंदिर परिसरात पूजेचे साहित्य, नारळ, प्रसाद, फुलं, आदी विक्रेत्यांना व्यवसायाची परवानगी राहिल.

दर्शनासाठी मंदिर खुले राहील. मात्र दर्शनासाठी येणाऱ्यांनी कोरोना लसीचे दोन्ही लस घेतलेले असावे. तसे प्रमाणपत्राची झेरॉक्स व आधार कार्ड सोबत आणावे. तसेच मंदिरात मंदिर प्रशासनाने शासकीय नियमानुसार प्रवेश प्रक्रिया करावी, यावर्षी या यात्रोत्सवात तमाशा, रोडाली, पाळणे, यासह इतर मोठ्या कोणत्याही व्यवसायिकांना परवानगी राहणार नाही याची दखल घ्यावी. पोलिस यंत्रणा या गोष्टींवर नजर ठेवून असणार आहे अशा सूचना दिल्या.

अप्पर तहसीलदार विनायक थविल यांनी मंदिर प्रशासनास परिसरात सॅनिटायझर, सोशल डिस्टन ठेवावे तसेच मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यांवर पंचायत समिती आरोग्य विभागातर्फे लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. या ठिकाणी लसीचे पहिली व दुसरी लस देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आधार कार्ड व मोबाईल नंबर अवश्य आणावा व लसीकरण करून घेणे बंधनकारक राहील. मंदिर दिवसभर खुले राहणार असून भाविकांनी नियमांचे पालन करत दर्शनाचा लाभ घ्यावा, असे सांगितले. शेवटी सपोनी सचिन साळुंखे यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com