धक्कादायक : दोंडाईचा येथे विद्यार्थीनीवर बलात्कार

दोघांवर गुन्हा दाखल, नंदुरबार येथे अत्याचार केल्याची तक्रार
धक्कादायक : दोंडाईचा येथे विद्यार्थीनीवर बलात्कार

दोंडाईचा Dondaicha । श.प्र.

दोंडाईचा येथील विद्यार्थीनीवर (student) नंदुरबारात अत्याचार (Tyranny) केल्याची तक्रार (Complaint) पीडिताने दोंडाईचा पोलिस ठाण्यात (Dondaicha Police) दिली. त्यावरुन दोंडाईचा पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे.

दोंडाईचा शहरातील संत कबीरदास नगरात राहणारी 17 वर्षीय विद्यार्थीनी दि. 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी भाऊबीजनिमित्त नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दोंडाईचा शहरातील बसस्थानकाजवळ असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये आली होेती. त्यावेळी अलताफ आजम शेख रा. दोंडाईचा हा आला व त्याने त्या विद्यार्थीनीला तुझ्याशी बोलायचे आहे. असे सांगून मोटार सायकलीजवळ नेले.

तेथे तोंडाला रुमाल बांधून एक जण थांबलेला होता. त्यावेळी शेखने पँटच्या खिशातून चाकू काढून तुझ्या पोटात खोपसेल अशी धमकी दिली. त्यामुळे मी घाबरुन गेली. अलताफ शेखने माझे तोंड दाबून मोटार सायकलीवर बसविले व तोही मोटार सायकलीवर बसला व त्याने नंदुरबार शहराकडे त्या मुलाला मोटारसायकल नेण्यास सांगितले.

सायंकाळी नंदुरबार बसस्थानका शेजारी असलेल्या ममता रेस्ट हाऊस येथे नेले व त्या ठिकाणी तोंडाला रुमाल बांधलेला मुलगा मोटारसायकलीवरुन निघून गेला. त्यानंतर अलताफने ममता रेस्ट हाऊस येथील एका खोलीत नेवून माझ्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा मोटारसायकलीवरुन दोंडाईचा येथील अमरावती नदीजवळील रोडवर सोडून दिले. अशी तक्रार पीडिताने दोंडाईचा पोलीस ठाण्यात दिली. तिच्या तक्रारीवरुन भादंवि 376 (1), 363, 366 अ, 504, 34 सह लैंगिक अत्याचारपासून बालकाचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 3, 4, 7, 8, 16, 17 प्रमाणे अलताफ आजम शेख व तोंडाला रुमाल बांधलेला मुलगा यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Stories

No stories found.