धक्कादायक : साक्रीत 17 वर्षीय मुलाचा 14 वर्षीय मुलीवर बलात्कार

धक्कादायक  : साक्रीत 17 वर्षीय मुलाचा 14 वर्षीय मुलीवर बलात्कार

धुळे । Dhule। प्रतिनिधी

साक्रीत धक्कादायक व खळबळजनक घटना घडली आहे. 17 वर्षीय मुलाने अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी साक्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शेनपूर (ता. साक्री) येथील 65 वर्षीय वृध्दाने साक्री पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दि.24 रोजी साक्री शहरातील उदय पॅलेसच्या मागे राहणार्‍या 17 वर्षीय मुलाने फिर्यादीची नातेवाईक असलेल्या 14 वर्षीय मुलीला आपल्या घरी बोलवून घेेतले. दि.24 ते 28 दरम्यान ती मुलगी त्याच्याच घरी राहिली.

दि.26 रोजी त्याने तिच्याशी शारिरीक संबंध केले. याप्रकरणी भादंवि 376 (3), 363 सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासूून संरक्षण अधिनियम 4 प्रमाणे अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक पी.एम. बनसोडे तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com