
धुळे । Dhule । प्रतिनिधी
पदे फक्त मिरविण्यासाठी नाही (posts are not just for show) तर रसातळाला लागलेल्या लोकांना (people) त्यांचे न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी पक्षाने दिली आहेत. आपली पद सार्थकी करून दाखवाचे आहे. तेव्हा शिवसेनेची ताकद (strength of Shiv Sena) तालुक्यात वाढल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास शिवसेेनेचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री (Co-liaison chief Mahesh Mistry) यांनी व्यक्त केला.
शहरातील दाता सरकार मंगल कार्यालयात आज तालुका शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानांतर्गत (Shiv Sampark Abhiyan) मेळावा घेण्यात आला. यावेळी शिर्डीचे खा. सदानंद लोखंडे, सहसंपर्क प्रमुख महेश मिस्त्री, साक्रीच्या आ. सौ. मंजुळा गावित, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.तुळशीराम गावित, हिलाल माळी, सतिश महाले, मनोज मोरे, डॉ.सुशील महाजन, कैलास पाटील, विलास पाटील, बबन थोरात आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी खा.लोखंडे यांनी देखील मार्गदर्शन केले.
पुढे बोलतांना महेश मिस्त्री म्हणाले की, तालुक्यात एकेकाळी सेनेचे 13 ते 14 जिल्हा परिषद सदस्य (Zilla Parishad Member) होते. स्वतः तालुका प्रमुख पंचायत समितीचे सभापती झाले. पंरतू मध्यस्तरीच्या काळात तालुक्यात शिवसेना खाली गेली. चढउतार चालु असते. जो थकून जातो, तो कुणाला न्याय मिळवून देवू शकते नाही. यापुढे तालुक्यातील उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुखांनी कामाला लागावे. खते, बी-बियाण्याबाबत कुठल्याही शेतकर्याला( Farmers) त्रास होता कामा नये. एखाद्या शेतकर्याचा फोन आला तर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी धावून जा. हात जोडून न्याय मिळत असेल तर ठिक नाही तर आक्रमक व्हा, असे आदेशही त्यांनी दिले.