शिवसेनेने केली मनपाच्या प्रवेशद्वारी घटस्थापना

देवपूरचे झाले खड्डापूर, मनपा सत्ताधारी आणि प्रशासनाची अभद्र युती, नऊ दिवस मांडणार ठिय्या
शिवसेनेने केली मनपाच्या प्रवेशद्वारी घटस्थापना

धुळे Dhule। प्रतिनिधी

देवपूर (Devpur) नव्हे तर ‘खड्डापूर’ (‘Khaddapur’) बनलेल्या शहराची अवस्था अत्यंत बकाल झाली असून आंदोलने, निदर्शने, इशारा देवूनही फरक पडत नाही. यामुळे शिवसेनेने (Shiv Sena) आज महापालिकेच्या प्रवेशद्वारी (entrance of the corporation) घटनस्थापना (Ghatsthapana) करुन नऊ दिवस ठिय्या मांडण्याचा निर्णय घेतला. यासाठी सेनेच्या पदाधिकार्‍यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोक अदालतीच्या माध्यमातून मनपाने सुमारे 80 ते 85 लाख रुपये जमा केलेत. यातून काही प्रमाणात का होईना खड्डे बुजविता आले असते. परंतु निर्ढावलेले मनपा सत्ताधारी व प्रशासन यांना काहीही फरक पडत नाही, असा आरोप शिवसेनेने केला आहे. यापुर्वी आंदोलन करुन नवरात्रोत्सवापुर्वी खड्डे बुजविण्याचा इशारा दिला होता. अन्यथा मनपा प्रवेशद्वारासमोर घटनस्थापना करु असेही सेनेने सांगितले होते.

त्यानुसार आज मनपा प्रवेशद्वारासमोर या आंदोलनाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी, जिल्हाप्रमुख डॉ.तुळशीराम गावित, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, माजी सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख मनोज मोरे, विधानसभा संघटक डॉ.सुशील महाजन, प्रफ्फुल पाटील, संदीप चव्हाण, नितीन शिरसाठ, संदीप सूर्यवंशी, देवा लोणारी, रामदास कानकाटे, पंकज भारस्कर, सचिन बडगुजर, मच्छिंद्र निकम, शेखर बडगुजर, योगेश मराठे, योगेश चौधरी, प्रमोद चौधरी, आबा भडागे, पंकज चौधरी, हरीश माळी, प्रवीण साळवे, भटू गवळी, रविद्र बिलाडे, किशोर माळी, शिवराज चौधरी, बाळू आगलावे, संजय वाल्हे, निलेश मराठे, आदेश मराठे, शुभम मतकर, संदीप चौधरी, शरद गोसावी, विकास शिंगाडे, गुलाब सोनवणे महिला आघाडीच्या जिल्हा संघटक संगीता जोशी, उपजिल्हा संघटक सुनिता वाघ, शहर प्रमुख अरुणा मोरे, महानगर संघटक डॉ.जयश्री वानखेडे, योगिता मजरे, कविता वाघ, मनीषा शिरोडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

सेनेने पत्रकात म्हटले आहे की, प्रचंड अडचणींचा सामना करत नरकयातना भोगणार्‍या देवपूरच्या नागरिकांनी देवपूर नव्हे खड्डेपुर असे नामकरण कधीच करून टाकले आणि ते नामकरण अतिशय योग्य आहे. देवपूरसह संपूर्ण शहराची अवस्था देखील अतिशय बकाल झाली आहे.

गल्ली बोळातील व कॉलनी परिसराचे तर जाऊच द्या परंतु शहराचे प्रमुख रस्ते ज्यात जुने जिल्हाधिकारी कार्यालय नवे जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस मुख्यालय, तहसील कचेरी, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिजामाता हायस्कूल, कमलाबाई हायस्कूल, कारागृह, पोलीस मुख्यालयाकडून फाशीपूल पर्यंत जाणारा मॉडेल नावाचा रस्ता, साक्री रोड, पारोळा रोड, 80 फुटी रोड, 100 फुटी रोड, खोलगल्ली असे अनेक प्रमुख व उप रस्त्यांची अवस्था अंत्यत बिकट झाली आहे.

ज्यावर दरवर्षी खड्डे बुजवण्याचे 30 ते 40 लाखांचे टेंडर काढले जाते. हे सर्व प्रमुख रस्ते आहेत. यात कॉलनी परिसर व गल्लीबोळ घेतलीच नाही तसेच शहराची पालक असलेली जुनी महापालिका असो की नवी महापालिकेच्या प्रवेशद्वारा समोरच मनपाच्या अब्रूचे धिंडवडे उडवणारे मोठमोठे खड्डे स्वागत करत आहेत.

शहराचा सर्वांगीण विकास चांगले रस्ते, गटारी, वेळेवर पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरिकांच्या अधिकार असलेल्या व मनपाची जबाबदारी असलेल्या सर्व मूलभूत गरजा पूर्ण होतील. या भाबड्या आशावादावर 50 नगरसेवकांचे दान ज्या भाजपच्या पदरात टाकले त्या भाजपानेच धुळेकरांची दिशाभूल करुन नागरिकांना वार्‍यावर सोडून दिले आहे.

मनपा सत्ताधारी आणि प्रशासनाच्या संमतीनेच गैरव्यवहार होत असल्याचा आरोपही शिवसेनेने केला आहे. शहराची बकाल अवस्था करण्यास मनपातील टक्केवारी संस्कृती जबाबदार असल्याचे सांगत आजच्या आंदोलनात मनपा विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

Related Stories

No stories found.