शिक्षणाचे शिरपूर मॉडेल सर्वांसाठी आदर्शवत -कुलगुरु प्रा.डॉ. माहेश्वरी

शिक्षणाचे शिरपूर मॉडेल सर्वांसाठी आदर्शवत -कुलगुरु प्रा.डॉ. माहेश्वरी

शिरपूर Shirpur । प्रतिनिधी

बुद्धीमत्ता, कार्यक्षमता, श्रम संस्कृती, (Labor culture) चिकाटी अंगीकारुन विद्यार्थ्यांचे (students) सर्वांनी हीत जोपासण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे. भाईंचे शिक्षणाबद्दल (education) मोठे स्वप्न आहे. शिक्षणाचे शिरपूर मॉडेल (Shirpur model) सर्वांसाठी आदर्शवत आहे, शिक्षण संस्थेला भाईंनी पैसे कमविण्याचे साधन बनविले नाही, त्यांनी फार मोठे योगदान दिले आहे. अशा संस्थांना सहकार्य करण्याचे विद्यापीठामार्फत (university) नेहमीच सकारात्मक प्रयत्न केले जातील. सर्वत्र भारतीय विचारसरणी मध्ये बदल करण्याची व उच्च शिक्षणात अजूनही खूप बदल करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन कुलगुरू प्रा.डॉ.व्ही.एल. माहेश्वरी (Vice Chancellor Prof.Dr. Maheshwari) यांनी केले.

शिरपूर एज्युकेशन सोसायटी (Shirpur Education Society) व आर.सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट (R.C. Patel Educational Trust) तसेच आर.सी. पटेल फार्मसी महाविद्यालयातर्फे शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, आ.अमरिशभाई पटेल (MLA Amrishbhai Patel) यांच्या हस्ते कुलगुरू प्रा.डॉ.व्ही.एल. माहेश्वरी यांचा सत्कार (Hospitality) करण्यात आला. तसेच माहेश्वरी समाजातर्फेहीत्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

संस्था अध्यक्ष आ.अमरिशभाई पटेल हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी उमवि माजी कुलगुरु डॉ.के.बी. पाटील, संस्था कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, संस्था उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, संचालक बबनलाल अग्रवाल, प्राचार्य डॉ.एस. जे. सुराणा व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे बोलतांना डॉ.माहेश्वरी म्हणाले की, आ.अमरिशभाई पटेल यांचे शैक्षणिक कार्य खूपच अफाट असून दूरदृष्टीतून त्यांनी उभारलेल्या गुणवत्तापूर्ण (Quality) व दर्जेदार अशा शिरपूर एज्युकेशन सोसायटी व आर.सी. पटेल शैक्षणिक संस्थेतून असंख्य विद्यार्थी (students) घडत आहेत. त्यांच्या संस्था उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कार्यक्षेत्रात बेस्ट इस्टिट्यूट असून भाईंसारखे कणखर, अभ्यासू, अष्टपैलू, प्रगल्भ नेतृत्त्वाची सर्वत्र गरज आहे. भाई व त्यांची टीम उत्कृष्ट कामकाज सांभाळत आहे. असे त्यांनी सांगितले.

आ.अमरिशभाई पटेल म्हणाले, वाढत्या लोकसंख्येमुळे (population) भविष्यात अनेक प्रतिकूल परिस्थितीचा सामना सर्वांना करावा लागणार आहे. पण चांगल्या व दर्जेदार शिक्षणामुळेच (education) परिस्थितीत सुधारणा होईल. पुढील अनेक वर्षे आमच्या विचाराने काम सातत्याने करावे लागेल. शिरपूर तालुका एज्युकेशनल हब (Educational Hub) तयार करतोय. यावर्षी आयुर्वेदिक, होमिओपॅथी व काही मेडिकल कॉलेज सुरु होतील. मुंबईच्या एसव्हीकेएम संस्थेमार्फत देशभरात कॅम्पस मार्फत दर्जेदार शिक्षण देतोय. रोजगाराभिमुख आणि जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे यावर भर देत आहे. मनापासून शिक्षणासाठी (education) काम करतो, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. एनएमआयएमएस या देशातील सर्वोत्तम विद्यापीठाच्या माध्यमातून शैक्षणिक काम करतो. असे आ. अमरिशभाई पटेल (MLA Amrishbhai Patel) यांनी सांगितले.

कार्यक्रमाला शिरपूर पिपल्स बँकेचे चेअरमन योगेश भंडारी, सी.ए. श्रीकेश राठी, उपप्राचार्य डॉ.ए.ए. शिरखेडकर, प्राचार्य डॉ.नितीन जी. हासवाणी, प्राचार्य डॉ.जे.बी. पाटील, प्राचार्य डॉ.एस.बी. बारी, प्राचार्य डॉ.डी.आर. पाटील, डॉ. वैशाली पाटील, प्राचार्य डॉ.जे. एल. चौधरी, प्राचार्या डॉ.शारदा शितोळे, डॉ.नवीन जी. हासवाणी, डॉ.दिपक बाविस्कर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्वेतल पवार आणि प्रा.साक्षी नेल्सन यांनी केले. उपप्राचार्य डॉ.ए.ए. शिरखेडकर यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.