‘ ती’ एक लिंक कराल ‘क्लिक’ तर...

सायबर सेलकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा
‘ ती’ एक लिंक कराल ‘क्लिक’ तर...

धुळे Dhule। प्रतिनिधी

तुमचे सिमकार्ड बंद (SIM card off) होत आहे, असे सांगून एसमएसव्दारे लिंक (Link via SMS) पाठवून सायबर गुन्हेगारांकडून (cyber criminals) नागरिकांची (citizens) आर्थिक फसवणूक (Financial fraud) केली जात आहे. या सिमकार्ड केवायसी फ्रॉडपासून (SIM card KYC fraud) नागरिकांनी सावध (Be careful) रहावे, कोणीही अशा एसएमएसला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन येथील सायबर पोलिस ठाण्याचे (Cyber Police Station) पोलिस निरीक्षक सतीश गोराडे (Inspector Satish Gorade) यांनी केले आहे.

शहरातील नागरिकांना सध्या त्यांचे सिमकार्ड सस्पेंड होत आहे, असे एसएमएस प्राप्त होत आहेत. हे एसएमएस कोणत्याही मोबाईल कंपन्यांकडून येत नसून, सायबर चोरट्यांकडून टाकलेले जाळे आहे. अशा खोट्या व फसवणुकीच्या उद्देशाने येत असलेल्या एसएमएसमध्ये सायबर गुन्हेगार हे आपल्याला एक लिंक पाठवत आहेत. या लिंकद्वारे आपल्या बँक खात्यांची माहिती मिळविली जात आहे. यातून नागरिकांची आर्थिक फसवणूक होऊ शकते. यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही लिंक ओपन करू नयेत, असे आवाहन सायबर पोलिस ठाण्याने केले. आपल्यासोबत सायबर अपराध, फसवणूक झाली असेल, तर नागरिकांनी त्वरित सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, तसेच आपली तक्रार http:/ /cybercrime.gov.in या पोर्टलवर दाखल करू शकता, असेही श्री. गोराडे यांनी म्हटले आहे.

याबरोबरच सैन्यातील जवान असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. सोशल मीडियावर वेबसाइटवर वेगवेगळ्या वस्तू कमी किंमतीत विक्री करत असल्याचे प्रलोभन दाखवून खोट्या जाहिराती प्रसारित केल्या जात आहेत. यात ओएलएक्स, क्विकर यांसारख्या वेबसाइटवर भाडेतत्त्वावर घर, वाहन, मोबाईलसह अन्य वस्तू खरेदी- विक्रीचे व्यवहार केले जातात. या वेबसाइटवर काही जणांकडून मी भारतीय सैन्य दलातील अधिकारी, जवान असल्याचे भासवून सायबर गुन्हेगार फोन करून आपणास आगावू बुकिंग रक्कम देत असल्याचे सांगतात. त्यासाठी पैसे पाठवत असल्याचा यूपीआय क्यूआर कोड पाठविला जातो. सायबर गुन्हेगार हा यूपीआर क्यूआर कोड आपल्याला स्कॅन करण्यास सांगतो. यानंतर आपण पैसे येणार म्हणून सायबर गुन्हेगारांनी पाठविलेला यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करून आपला यूपीआय पिन टाकता. त्यानंतर आपल्याच खात्यातील पैसे कमी होतात. यातून अशा प्रकारे आपली आर्थिक फसवणूक केली जात आहे. यामुळे नागरिकांनी असे व्यवहार करताना योग्य ती काळजी, खबरदारी घ्यावी, असे आवाहनही सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतिष गोराडे यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com