दोंडाईचात शालकाने केला मेव्हूण्यावर चाकू हल्ला

दोंडाईचात शालकाने केला मेव्हूण्यावर चाकू हल्ला

दोंडाईचा । dondaicha । श.प्र.

दोंडाईचा येथे परिवाराच्या वादातून (family dispute) शालकाने (Shalak) मेव्हुण्यावर (brother-in-law) चाकू हल्ला (Knife attack) केला. त्यात मेव्हुणा गंभीर जखमी (seriously injured) झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार (Hospital treatment) सुरू आहे. शालकासह 10 ते 15 जणांवर दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरक्षा रक्षक तौसिफ लियाकत सैय्यद, (वय 31रा. रजा कॉलनी दोंडाईचा ह.मु कल्याण) यांच्या फिर्यादीनुसार, तो दि.12 रोजी दुपारी वडीलासह दोंडाईचा येथील इस्लामपुरा येथे राहणारे सासर कडे पत्नीला घेण्यासाठी आले होते. तेव्हा शालक शोएब जाकिर सैय्यद याने त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर मेव्हणे व शालक हे दोन्ही रजा कॉलनी येथे जात असतांना शालकाने जीवे मारण्याची धमकी दिली.

शालक शोएब जाकिर सैय्यद याने त्याचा मित्र सोनू शेख व त्याचे सोबत 10 ते 15 जणांनी संगनमत करून घराच्या अंगणात येवून शिवीगाळ करीत घरावर दगडफेक केली. तेव्हा फिर्यादी यांनी घरा बाहेर आले असता सोनु शेख याने त्याचे दोन्ही हात मागे धरून ठेवले. तर शालक शोएब जाकिर सैय्यद याने त्याच्या खिशातून चाकू काढून डाव्या साईडला बरगडीच्या खाली वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यात फिर्यादी हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

त्यानुसार दोंडाईचा पोलीस ठाण्यात शोएब जाकीर सय्यद मित्र सोनू शेख व त्यांचे 10 ते 15 मित्र यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक दुर्गेश यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष लोले हे तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com