लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

देवपूरातील घटना, तरूणावर गुन्हा दाखल
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

धुळे । Dhule। प्रतिनिधी

लग्नाचे आमिष (lure of marriage) दाखवून अल्पवयीन मुलीवर (minor girl) तरूणाने (Young) लैंगिक अत्याचार (Sexual harassment) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तरूणावर देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवपूरातील नेहरू नगर परिसरात राहणार्‍या पिडीत 16 वर्षीय मुलीने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इरफान अन्सारी (वय 21 रा. गल्ली नं. 5, नेहरू नगर, देवपूर) याने तिला लग्नाचे खोटे आमिष (lure of marriage) दाखवून तिच्यावर वेळोवेळी त्यांच्या राहत्या घरी, बडोदा येथे बोलावून हॉटेलमध्ये, व्हॅन व गॅरजमध्ये तिच्याशी शारिरीक संबंध (Sexual harassment) केले. तसेच तिला मारहाण करून जिवे मारण्याचीही धमकी दिली. त्यानुसार इरफान अन्सारी याच्या विरोधात भादंवि कलम 376 (2) (एन) (जे) सह बाललैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम सन 2012 चे कलम 4, 6, भादंवि कलम 323, 506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक रोहीनी जाधव करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com