सेल्फी पॉईट.. अन तोही ग्रामपंचायतीने बनवला... काय आहे गंमत

तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत, सरपंच ललिताबाई राजपूत यांचा पुढाकार
सेल्फी पॉईट.. अन तोही ग्रामपंचायतीने बनवला... काय आहे गंमत

समाधान ठाकरे

दोंडाईचा Dondaicha

सध्याच्या युगात सोशल मीडिया(Social media) व मोबाईलने संपूर्ण जगाला वेधले आहे. सेल्फी(Selfie) घेण्याचा मोह तर भल्याभल्यांना आवरत नाही. युवा वर्गाची वाढती क्रेझ पाहता लंघाणे (Laṅghaṇe) ता. शिंदखेडा येथे सरपंच ललिताबाई जितेंद्रसिंग राजपूत (Sarpanch Lalitabai Jitendrasingh Rajput) यांच्या पुढाकाराने सेल्फी पाईंट (Selfie point) तयार करण्यात आला आहे. सेल्फी पाईंट बनवणारी तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत (gram panchayat) ठरली आहे. हा पाईंट युवक व युवतींसाठी आकर्षण ठरत आहे.

शिंदखेडा तालुक्यातील लंघाणे (Laṅghaṇe) हे दोन हजार दोनशे लोकवस्तीचे गाव आहे. सरपंच ललिताबाई राजपूत (Sarpanch Lalitabai Jitendrasingh Rajput) व त्यांचे पती जितेंद्रसिंग राजपूत यांनी ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविल्यापासून शासन स्तरावरुन वेगवेगळ्या योजना खेचून आणत आहेत. तालुक्यातील पहिले मोबाईल सेल्फी पॉईंट(Mobile selfie point) याच गावात सुरू झाल्याने लंघाणे गावाची ही नवीन ओळख आता पुढे आली आहे.

मोबाईल सेल्फीसह ((Mobile selfie) डीएसएलआर फोटो कॅमेराचा वापर करून देखण्या इमारतीजवळ, कुठे नारळाचे झाड गाठून, नवनवीन दुचाकीवर भ्रमंती करून स्वतःचे व मित्रांचे फोटो(photo) काढणे, सूर्योदय व सूर्यास्त सुंदररीत्या कॅमेर्‍यात कैद करण्याची दमछाक करतांना युवक दिसून येतात. यासाठी चांगले ठिकाण शोधण्याची युवकांवर वेळ येते. ठिकाण शोधण्यात कधीकधी बराच वेळ निघून जात असल्याने युवकांच्या पदरी निराशा येते.

युवकांना आपल्या हक्काचे एक सेल्फी पॉईंट (Selfie point) उपलब्ध करून देण्यासाठी सरपंच ललिताबाई राजपूत व जितेंद्रसिंग राजपूत हे पुढे सरसावले आहेत. त्यांनी लंघाणे येथे सेल्फी पॉईंट विकसित केला आहे. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्त (Sunset) होत असतांना व त्यानंतर या ठिकाणी सेल्फी घेणार्‍या युवकांचा ओघ सुरू झाला आहे. सेल्फी घेणार्‍या युवक युवतींकडून आपले फोटो व्हाट्सअप स्टेटसवर किंवा इतर माध्यमांचा स्टेटस वर अपलोड होत असल्याने लंघाणे गावाचे नाव त्याचसोबत प्रसिद्ध होत आहे.

गावाच्या विकासात भर घालत सरपंच, ग्रामसेवक आदींच्या मेहनतीने सेल्फी पॉईंट उभारल्याने गावाच्या सौंदर्यात (beauty of the village) भर पडली आहे. म्हणून गावकर्‍यांतर्फे सरपंच प्रतिनिधी जितेंद्रसिंग गिरासे व ग्रामसेवक निलेश पाटील यांना हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी माजी सरपंच सत्तरआबा राजपूत, रंजीत राजपूत, सचिन राजपूत, गोपाल राजपूत, राहुल राजपूत, करण राजपूत, जयकुमार राजपूत, ईश्वर ठाकूर, संग्राम राजपूत, नरेंद्र ठाकूर व समस्त मेवाड रत्न ग्रुप उपस्थित होते.

लोकप्रतिनिधींचे कौतुक

इतर ग्रामपंचायतींनीही आदर्श घेत वेगवेगळे प्रकारचे विकास काम करण्यासाठी निधी उपलब्ध करून विकासात भर घालावी. सेल्फी पॉईंट उभारून लंघाणे ग्रामपंचायतीचा (gram panchayat) आदर्श घेण्याची गरज निर्माण झाली आहे. तालुक्यातील पहिल्या ग्रामपंचायतीला सेल्फी पॉईंट (Selfie point) उभारल्याने सरपंच ललिताबाई राजपूत व ग्रामसेवक एन. के. पाटील लोकप्रतिनधींचे कौतुक करण्यात येत आहे.

ललिताबाई राजपूत सरपंच लंघाणे ता. शिंदखेडा
ललिताबाई राजपूत सरपंच लंघाणे ता. शिंदखेडा

स्वप्न पूर्ण झाले तालुक्यात जे नाही ते माझ्या लंघाणे ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम करू असे स्वप्न मी पाहिले होते. आणि ते माझे सेल्फी पॉईंट बनविण्याचे स्वप्न होते. आज साकार झाल्याने मी भारावली आहे. अशाच प्रकारे विविध विकास काम करण्यांची इच्छा आहे. त्यासाठी ग्रामस्थांची साथ असणे गरजेचे आहे. तरच गावाचा विकास शक्य आहे.

-ललिताबाई राजपूत सरपंच लंघाणे ता. शिंदखेडा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com