‘शाळा बाहेरची शाळा’मध्ये रूपाली राठोडची निवड

‘शाळा बाहेरची शाळा’मध्ये रूपाली राठोडची निवड

बोराडी Boradi। वार्ताहर

हाडाखेड (Hadakhed) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील (Zilla Parishad school) इयत्ता सातवीची विद्यार्थिनी रूपाली रमेश राठोड (Rupali Ramesh Rathod) हिची नागपूर आकाशवाणी केंद्रावरून (Nagpur All India Radio) प्रसारित शाळा बाहेरची शाळा,(School Outside School) या कार्यक्रमाच्या 204 व्या भागासाठी निवड (Selection) झाली आहे.

जिल्ह्यातून निवड झालेली उपप्राथमिक शाळेतील रुपाली ही एकमेव विद्यार्थीनी आहे. नागपूर येथील प्रादेशिक विद्या प्राधिकरण व प्रथम फाउंडेशन यांच्यावतीने राज्यस्तरावर हा उपक्रम राबवला आहे.

शालेय अभ्यासाच्या विशिष्ट टास्क बद्दल माहिती देण्यासाठी रुपाली राठोड या विद्यार्थ्यांनीची निवड झाली. विचारलेल्या प्रश्नांची रूपालीने मोकळेपणाने उत्तरे दिली. सांगवी बीट शिक्षण विस्तार अधिकारी डॉ.निता सोनवणे यांच्या प्रोत्साहनामुळे हाडाखेड शाळेला बहुमान मिळाला, असे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुनंदा पवार यांनी सांगितले.

रुपालीला डॉ.निता सोनवणे, केंद्रप्रमुख के.व्ही. भदाणे, मुख्याध्यापिका सुनंदा पवार, संतोष माठी, राहुल सोमुशे व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तिचे जि.प.चे अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, शिक्षणाधिकारी मनिष पवार, गटविकास अधिकारी वाय.डी.शिंदे, एस.सी.पवार यांनी कौतुक केले. मुलाखतीसाठी प्रथम फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक भुवराज ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Stories

No stories found.