जिल्ह्यात लवकरच माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांची होणार नियुक्ती

आ. फारुक शाह यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन मांडले गार्‍हाणे
जिल्ह्यात लवकरच माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांची होणार नियुक्ती

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

धुळे जिल्ह्यात लवकरच माध्यमिक शिक्षणाधिकारी दिला जाईल, असे आश्वासन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले. शहराचे आ.डॉ.फारुक शाह यांनी त्यांची भेट घेवून याबाबतची मागणी केली होती.

विविध शिक्षक व शिक्षिकेत्तर कर्मचारी संघटनांनी जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थेच्या वतीने आ.फारूक शाह यांना निवेदन देवून गार्‍हाणे मांडले होते. शिक्षणाधिकारी नसल्याने अनेक कामे खोळंबल्याची तक्रार त्यांनी केली होती.

या अनुशंगाने आ.शाह यांनी मंत्रालयात शिक्षण मंत्री ना.वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

या चर्चेला मंत्री गायकवाड यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच धुळे जिल्ह्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकार्‍याची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात येईल, असे आश्वासन आ.फारूक शाह यांना दिले.

शिक्षणाधिकारी नसल्यामुळे शैक्षणिक संस्था,शिक्षकांचे व शिक्षिकेत्तर कर्मचार्‍यांचे मोठ्या प्रमाणात काम प्रलंबित आहे. शिक्षक संघटनेनी वारंवार निवेदन देवून सुद्धा शिक्षणाधिकारी यांची नियुक्ती होत नाही. काही संघटनांनी याबाबत आंदोलनेही केलीत.

माध्यमिक शिक्षणाधिकारीच नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अडसर निर्माण झाल्याने ही तक्रार आ.शाह यांच्याकडे करण्यात आली. त्यानुसार त्यांनी तातडीने शिक्षण मंत्र्यांची भेट घेवून ही समस्या त्यांच्या कानावर घालत यातून सकारात्मक प्रतिसाद मिळविला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com