शाळा, अंगणवाड्या झाल्या चकाचक

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता मोहिम; ग्रामस्थांचा उत्स्फुर्त सहभाग
शाळा, अंगणवाड्या झाल्या चकाचक

धुळे Dhule । प्रतिनिधी

स्वच्छ भारत मिशन (Swachh Bharat Mission) ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत आज जिल्ह्यातील शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये (schools and anganwadas) स्वच्छता मोहीम (Cleaning campaign) राबविण्यात आली. स्वच्छतेच्या या उपक्रमात अनेकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., (Zilla Parishad Chief Executive Officer Vanmathi C.,) पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. देवरे (Deputy Chief Executive Officer of Sanitation Department D. M. Devare) यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबविण्यात आले.

दि 19 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून वैयक्तिक, सार्वजनिक, शाळा, अंगणवाडीमधील शौचालयांचा शाश्वत वापर, योग्य देखभाल व दुरुस्ती आणि अनुषंगिक सुविधांच्या उपलब्धतेच्या अनुषंगाने पूरक ठरणारे विविध उपक्रम राबविण्याबाबत शासनाच्या सूचना होत्या. त्यानुसार आज दि.23 रोजी जिल्ह्यातील गावांमधील शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतेचा उपक्रम राबविण्यात आला. स्वच्छतेच्या या मोहिमेमध्ये शिक्षक, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, ग्रामसेवक तसेच युवकांनी उस्फूर्तपणे सक्रिय सहभाग नोंदविला. यामध्ये शालेय स्वच्छताग्रह, शाळेचा परिसर, वर्गखोल्या तसेच अंगणवाडीचा परिसर आदीं ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छतेच्या या उपक्रमात गावागावातील अनेकांचे हात राबल्याचे चित्र दिसून आले. यासाठी सर्व गटशिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि ग्रामसेवकांना यापूर्वीच सूचना देण्यात आल्या होत्या. शाळा, अंगणवाडीत स्वच्छता मोहीम राबवून उपक्रमाचा समारोप करण्यात आला. यापूर्वी गावात कुटुंबस्तर शौचालय, परिसर स्वच्छता तसेच हात धुवा प्रात्यक्षिक, शोष खड्डा बांधकाम आदी उपक्रम सप्ताहात घेण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com