पिंपळनेर येथे काँग्रेसचे‘सत्याग्रह’ आंदोलन

पिंपळनेर येथे काँग्रेसचे‘सत्याग्रह’ आंदोलन

पिंपळनेर Pimpalner । वार्ताहर

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे लोकसभा सदस्यत्व (Lok Sabha membership) रद्द करून केंद्रातील मोदी सरकारने (Modi Govt) देशात लोकशाहीचा (democracy) गळा घोटला आहे. एका खोट्या प्रकरणाचा आधार घेऊन राहुल गांधी यांच्यावर चोवीस तासांच्या आत कारवाई करण्याची मोदी सरकारला घाई का झाली होती? हा निर्णय घेऊन मोदी सरकारने हिटलरशाही सुरू केली आहे, अशी टीका काँग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी केले.

पिंपळनेर येथे तालुका काँग्रेस व शहरातर्फे माजी खा.बापू चौरे व जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांच्या नेतृत्वात केंद्रातील मोदी सरकारविरोधात सत्याग्रह ('Satyagraha' movement) आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त करीत केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली.

आगामी निवडणुका समोर ठेवून ही कारवाई हेतुपुरस्कर केली आहे. परंतु काँग्रेस मोदींच्या दडपशाहीला घबरत नाही. आता जनताच भाजपला धडा शिकवेल, अशी टीकाही यावेळी शाम सनेर यांनी केली. राहुल गांधींचा आवाज ईडीच्या माध्यमातून बंद करण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण त्यात मोदी सरकारला यश आले नाही. राहुल गांधी यांची लोकप्रियता देशभर वाढत आहे. जनतेच्या प्रश्नांना ते वाचा फोडत आहेत. महिला, तरुणवर्ग, बेरोजगार, छोटे व्यापारी, शेतकरी, कष्टकरी यांना राहुल गांधी यांच्यामध्ये आशेचा किरण दिसत आहे.

भारत जोडो यात्रेत त्याचा अनुभव आला असून भारतीय जनता पक्षाला राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता सहन झाली नसल्याचा आरोपदेखील यावेळी शाम सनेर यांनी केला. चोरांच्या उलट्या बोंबा या पद्धतीने भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करत असताना त्यांना त्यांचे भान नाही. राहुल गांधीविरोधात केलेल्या कारवाईच्या निषेध नोंदवित काँग्रेसतर्फे पिंपळनेर येथील समोडे चौफुली येथे तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. सदृढ लोकशाहीमधे विरुद्ध पक्ष असणे आवश्यक आहे.

मात्र मोदी शासनाच्या विरोधामध्ये विरोधी पक्षाने आवाज उठवतांना दिसताच त्यांच्या मागे चौकश्या लावत, त्यांना तुरुंगात रवानगी करण्यात येते, असे मत माजी खा. बापू चौरे यांनी व्यक्त केले. तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे म्हणाले की, काँग्रेस कार्यकर्ते पुन्हा जोमाने भाजपा, हुकूमशाहीच्या विरोधात आवाज उठवतील. तर ओबीसी समाजात अनेक आडनाव असतात. त्यामुळे जातीवाचक होत नाही, असे मत व्यक्त केले. यावेळी पांडुरंग सूर्यवंशी व पी.एस.पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

आंदोलनात माजी आ.वसंत सूर्यवंशी, किसान काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष उत्तमराव देसले, सत्यशोधक शेतकरी कष्टकरी संघटनेचे नेते कॉ.डोंगर बागुल, साक्री पं.स. सभापती शांताराम कुवर, काँग्रेस कार्यकर्ते प्रवीण चौरे, एकनाथ गुरव, जि.प सदस्य धीरज अहिरे, विश्वास बागुल, माजी सभापती गणपत चौरे, जि.प सदस्य लता पवार, युवक काँग्रेसचे गणेश गावीत, पंकज सूर्यवंशी, पं.स सदस्य.धुडकू भारुडे, सतीश पाटील, प्रभाकर भदाणे, अनिल गायकवाड, रावसाहेब खैरनार, नारायण भदाणे, सचिन राऊत, शिवाजी भामरे, रमेश गांगुर्डे, राजू पवार, सचिन सोनवणे, सरपंच ओंकार राऊत आदी सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com