सरकारसाहेब रावल यांचा आज अमृत महोत्सवी गौरव सोहळा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना.रावसाहेब दानवे सह चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थितम
सरकारसाहेब रावल यांचा आज अमृत महोत्सवी गौरव सोहळा

दोंडाईचा । Dondaicha । प्रतिनिधी

सुप्रसिध्द उद्योगपती सरकारसाहेब रावल (Industrialist Sarkarsaheb Rawal) यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा अमृत महोत्सव गौरव सोहळा, (Amrit Mahotsav) स्वोध्दारक विदयार्थी संस्थेच्या (Swadhdharka Vidyarthi Sanstha) स्थापनेला 100 वर्ष पुर्ण झाल्याने शताब्दी महोत्सवानिमित्त (Centenary celebrations) कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचा शुभारंभ तसेच बहुउददेशिय सकुंलाचे लोकार्पण, दादासाहेब रावल उदयोग समुहाला 50 वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने नविन ग्लुकोज फॉर्मासिटीकल प्रकल्पाचा शुभारंभ तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अमरावती आणि भोगावती नदीच्या संगमावर गढी जवळ 75 फुटी ध्वजस्तंभाचे उद्घाटन आदी कार्यक्रमांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे दोंडाईचा येथे आज दि.30 जुलै रोजी येत आहेत.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून खा.डॉ.सुभाष भामरे, खा.डॉ.हिना गावित, माजीमंत्री आ.गिरीश महाजन, आ.गुलाबराव पाटील, आ.दादा भुसे, आ.जयकुमार रावल, आ.अमरिषभाई पटेल, आ.काशिराम पावरा, आ.राजेश पाडवी, आ.विजयकुमार गावित, आ.मंजुळा गावित, दोंडाईचा शहराच्या माजी नगराध्यक्षा सौ.नयनकुंवरताई रावल यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, जि.प.अध्यक्ष तुषार रंधे, उपाध्यक्ष कुसुमबाई निकम, पं.स.च्या सभापती अनिता पवार, उपसभापती राजेश् पाटील, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहतील.

दरम्यान, सुरवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करतील. त्यानंतर रावल उदयोग समुहाला 50 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल सुवर्ण महोत्सवानिमित्ताने तयार करण्यात आलेल्या नविन ग्लुकोज प्लाँटच्या इमारतीचे लोकार्पण, त्यानंतर स्वो.वि.संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाल्याने संस्थेच्या कृषी महाविद्यालयाच्या नविन इमारतीचा लोकार्पण सोहळा तसेच त्याचठिकाणी बहुउद्देशिय सकुलांचा लोकार्पण सोहळा, त्यानंतर महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारकाला अभिवादन, दोंडाईचाचे शेवटचे राजे श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल यांच्या स्मारकाला अभिवादन करून ते लोकनेते सरकारसाहेब रावल यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात येवून त्याठिकाणी सहकारमहर्षी दादासाहेब रावल सह.सुतगिरणीच्या कार्यालयाचा शुभारंभ करतील. तसेच याठिकाणी असलेल्या शेतकरी मेळाव्याला संबोधित करतील.

त्यानंतर स्वातंत्रयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 फुटी ध्वजस्तंभाचे उद्घाटन होईल. तेथून रावल गढीला भेट देतील. असा त्यांचा कार्यक्रम असणार आहे. या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन लोकनेते सरकारसाहेब रावल अमृत महोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com