Photos # रावल गढीचा कर्तृत्व, नेतृत्व अन् दातृत्वाचा वारसा सरकारसाहेबांनी जोपासला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार : रावल यांचा अमृत महोत्सव सोहळा
Photos # रावल गढीचा कर्तृत्व, नेतृत्व अन् दातृत्वाचा वारसा सरकारसाहेबांनी जोपासला

दोंडाईचा Dondaicha । प्रतिनिधी

खान्देशात कर्मवीर म्हणून ओळख असलेले रावल गढीचा (Rawal Garhi's) ऐतिहासिक असा वारसा असून या घराण्याचा कर्तृत्वाचा, नेतृत्वाचा (Family achievement, leadership) आणि दातृत्वाचा वारसा सरकारसाहेब रावल (Sarkarsaheb Rawal) यांनी जोपासण्याचे काम केले असून शिक्षण संस्था असो किंवा रावल उद्योग समुह असो या माध्यमातून त्यांनी ते दाखवून दिले असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी काढले.

आज दोंडाईचा येथील उद्योगपती सरकारसाहेब रावल यांचा अमृत महोत्सवी सोहळा, दादासाहेब रावल उद्योेग समूहाचा सुवर्ण महोत्सव, स्वोध्दारक विद्यार्थी संस्थेचा शताब्दी महोत्सव तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने 75 फुटी ध्वज स्तंभाचे लोकार्पण असे विविध कार्यक्रम ना. फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले आहे.

यावेळी बोलतांना ना.फडणवीस म्हणाले की, आपल्या भागातील शेतकर्‍यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी लोकांच्या हातांना काम मिळावे यासाठी 50 वर्षापूर्वी स्टार्च फॅक्टरीच्या माध्यमातून मकावर प्रकिया करणारा उद्योग उभारण्याचे महान कार्य रावल परिवाराने केले. त्यास 60 मेट्रीक टन मका प्रकिया क्षमतेपासून ते 500 मेट्रीक टन दैनंदिन प्रकिया सरकारसाहेब रावल यांनी ही किमया करून दाखविली. उद्योेगासोबतच सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असतात, आज रावल परिवाराने उभारलेल्या शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालय आणि बहुउद्देशीय सकुंलाचे लोकार्पण केले, आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्रात मोठे बदल करण्याबाबत सुचित केले असून त्यामुळे कृषीचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात अमुलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे. असे त्यांनी सांगितले.

सरकारसाहेबांचा पायगुण चांगला- सरकारसाहेबांचा जन्म 2 ऑगस्ट 1947 रोजी झाला. त्यांच्या बारश्याच्या दिवशी म्हणजेच 14 ऑगस्टच्या मध्यरात्री देशाला स्वातंत्र्य मिळाले म्हणून सरकार ठेवले. आज देशाचा आणि सरकारसाहेब रावल यांचा अमृतमहोत्सवी वर्ष आहे. आणि राज्यातही आपले सरकार आले आहे आणि मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून या कार्यक्रमाला येवू शकलो हा सरकारसाहेबांचा पायगुणच म्हणावा लागेल असे म्हणत ना.फडणवीस यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

शिंदखेडा आणि धुळे तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली सुलवाडे-जामफळ-कनोली उपसासिंचन ही योजना मागच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष बाब म्हणून मंजूर केली. आणि त्यासाठी पाठपुरावा तत्कालीन मंत्री जयकुमार रावल, खा.सुभाष भामरे आणि गिरीष महाजन यांनी वेळोवेळी केला. त्यामाध्यमातून आज ही योजना प्रगती पथावर आहे. हे नेते या योजनेचे श्रेय मला देतात, परंतु या योजनेचे खरे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सतत पाठपुरावा करणारे या त्रिमूर्तींचेच आहे. असेही फडणवीस म्हणाले.

मागील भाजप सरकारच्या काळात जलयुक्त शिवार ही योजना सरकारने राबविली होती. त्या योजनेचा सकारात्म्क परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात झाला. तसा या भागालाही मोठा लाभ झाला. कायम दुष्काळी असलेला हा भाग मागील काही वर्षापासून मोठयाप्रमाणावर टंचाईमुक्त झाल्याचे दिसून येत आहे. नवीन स्थापन झालेले हे सरकार पुन्हा नव्याने ही योजना प्राधान्याने राबविणार असल्याचे ना.फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी माजीमंत्री गिरीष महाजन, खा.डॉ.सुभाष भामरे, आ.जयकुमार रावल, आ.अमरिशभाई पटेल, सरकारसाहेब रावल, नगराध्यक्षा नयनकुंवरताई रावल, आ.संजय सावकारे, आ.राहुल ढिकले, आ.काशीराम पावरा, आ.सीमा हिरे, आ.राजेश पाडवी, माजी आ.स्मिता वाघ, माजी आ.राजवर्धन कदमबांडे, बबन चौधरी, सुभाष देवरे, महापौर प्रदीप कर्पे, नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी, जयपालसिंग रावल, भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, उपाध्यक्षा कुसुम निकम, महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, माधुरी बाफना, शहाद्याचे दीपक पाटील, भरत माणिकराव गावीत, विजय चौधरी, मंगला पाटील, धरती देवरे, संग्राम पाटील, राम भदाणे, शिंदखेडा पं.स. सभापती अनिता पवार, नगराध्यक्षा रजनी अनिल वानखेडे, अमरजीत गिरासे, स्वोध्दारक विद्यार्थी संस्था सेक्रेटरी सी.एन. राजपूत, प्रवीण महाजन आदी उपस्थित होते.

प्रकाशा-बुराई योजनेला गती देणार

शिंदखेडा व नंदुरबार तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरणारी प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेला सत्तेत असतांना गती देण्याचे काम केले होते, परंतु मागील सरकारने या योजनेला बारगळवण्याचे काम केले. आता या योजनेसाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता असून लवकरच ती देण्यात येईल. व अपूर्ण कामाला गती देण्याचे काम हे नवीन सरकार करणार असल्याचे आश्वासन ना.फडणवीस यांनी दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com