संजय बंब फरारच, मुलगा सौरभची केली चौकशी

संजय बंब फरारच, मुलगा सौरभची केली चौकशी

धुळे । Dhule प्रतिनिधी

अवैध सावकार राजेंद्र बंबचा (Illegal moneylender Rajendra Bamba) भाऊ संजय बंब (Brother Sanjay Bomb) हा अद्यापही फरार (Fugitive) असून पोलिस पथकाकडून त्याचा कसून शोध सुरू आहे. दरम्यान, काल तपासयंत्रणेने (investigation) त्याचा मुलगा सौरभ बंब याची पाच तास कसून चौकशी (Thorough inquiry) केली. त्याने वडील संजय बंब हे कुठे आहेत, याबाबतही काहीही माहित नसल्याचे त्याने यावेळी सांगितले.

विमा एंजट तथा अवैध सावकार राजेंद्र बंब याच्यावर जयेश दुसाणे यांच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. पहिल्याच दिवशी राजेंद्र बंबचा भाऊ संजय बंब याच्या घरातूनही गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे आणि 12 लाख 9 हजार 400 रुपये रोख असा मुद्येमाल जप्त करण्यात होता. तेव्हा त्याला चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. परंतू तो आला नाही. त्यानंतर मात्र तो फरार झाला.

त्याचा शोध सुरू असून अद्यापही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो सापडत नसल्यामुळे त्याच्याकडे मिळून आलेल्या दस्तऐवजाबाबत चौकशी करून त्याला अटक करावयाची आहे.

तसेच त्याचा मुलगा सौरभ याच्या नावाने एका पतसंस्थेत लॉकर असल्याची माहिती तपासयंत्रणेला मिळाली होती. त्या लॉकरबाबत विचारपुस करण्यासाठी दोघांनी आर्थिक गुन्हे शाखेत हजर रहावे, अशी नोटीस संजय बंब याच्या घराला चिटकविण्यात आली होती. त्यानुसार शनिवारी सौरभ संजय बंब हा स्वतःहून तपासयंत्रणेसमोर हजर झाला.

त्यांची पोलिस निरीक्षक हेमंत बेंडाळे यांनी सुमारे पाच तास चौकशी केली. वडीलांबाबत व कोणत्या बँक अथवा पतसंस्थेत खाते आहे का, अशी विचारा केली असता त्याने नकार देत सौरभने समाधानकारण उत्तरे दिली नाही. त्यामुळे त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलविण्यात येणार आहे.

राजेंद्र बंबला आज न्यायालयात करणार हजर

राजेंद्र बंबवर प्रमोद जैन आणि गणेश गवळी यांच्या तक्रारीवरून आझादनगर पोलिसात दोन तर शहर पोलिसात एक गुन्हा दाखल आहे. बंब सध्या गवळी यांच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यात पोलिस कोठडीत आहे. या कोठडीची मुदत उद्या दि.20 रोजी संपत असल्यामुळे बंबला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

तर जैन यांच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यात आझादनगर पोलिस बंबला पुन्हा ताब्यात घेण्याची शक्यता असून त्याच्या पोलिस कोठडीचीही मागणीही पोलिसांकडून होण्याची शक्यता आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com