समाजवादी पार्टीचा वीज कार्यालयावर मोर्चा

समाजवादी पार्टीचा वीज कार्यालयावर मोर्चा

धुळे Dhule । प्रतिनिधी

वीज वितरण कंपनीच्या (Electricity Distribution Company) कार्यालयावर समाजवादी पार्टीने (Samajwadi Party) आज मोर्चा (march) काढून त्यांच्या कार्यपद्धती विरुद्ध जोरदार घोषणाबाजी (Sloganism) केली. शहरात अनेकठिकाणी डीपीवरील फ्यूज उडून वीजपुरवठा खंडित होतो. वडजाई रोड, रामवाडी परिसरात तर दिवसातून अनेकदा वीज पुरवठा खंडित (Power supply interrupted) होत असून आठ-आठ तास वीज येत नाही. यामुळे नागरिकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते आहे. या निषेधार्थ समाजवादी पार्टीतर्फे आज अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी केली. विजेची समस्या लवकर सुटली नाही तर वीज कंपनी अधिकार्‍यांच्या कार्यालयातील फ्यूज काढून एसी, पंखे बंद करू असा इशाराही देण्यात आला.

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अनेक भागात विजेचा लंपडाव सुरू आहे. शहरातील अनेक डीपींवरील फ्यूज वारंवार जात असल्याने याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. हा खंडित वीजपुरवठा सुरळीत होण्यास सात ते आठ तास लागतात. वडजाई रोडवरील रामवाडी परिसरात वीज पुरवठा खंडीत होण्याची समस्या कायमचीच डोकेदूखी ठरू पाहत आहे.

या परिसरातील विद्यूत तारा खाली लोंबकळलेल्या आहेत. येथील डीपी उघड्या असल्याने भविष्यात जीवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक भागात कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्याने तक्रार केल्यावर वीज पुरवठा सुरू होण्यास विलंब लागतो. वरील समस्यांचे तात्काळ निवारण न झाल्यास समाजवादी पार्टीतर्फे कंपनीच्या अधिकार्‍यांच्या दालनातील फ्यूज काढून एसी व पंखे बंद केले जातील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

दरम्यान, अधिक्षक अभियंत्यांना निवेदन दिल्यावर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर निदर्शनेही करण्यात आली. यावेळी नगरसेवक अमीन पटेल, जमील मन्सुरी, अकिल अन्सारी, इनाम सिद्दीकी, हाजी खुर्शीद, जाकिर खान, आसीफ मन्सुरी, मोहसिन शेख, रमजान पहेलवान, अन्वर हुसेन, सल्लुभाई, मुन्नवरभाई, अकिल अहमद, हसन बडे, जाविद अन्सारी, नाविद अख्तर, आसिफ अन्सारी, गुलाम कुरेशी, मुदस्सीर मुकादम, मोहम्मद नासिर, रमजान टेलर, सलिम टेलर आदी उपस्थित होते.

दरम्यान आंदोलनकर्त्यांचे म्हणणे अधिकार्‍यांनी ऐकूण घेवून यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल. असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com