अर्शदसह सलीमला अटक, दोघांना पोलिस कोठडी

देवपूरातील तरूणीचे अत्याचार प्रकरण
अर्शदसह सलीमला अटक, दोघांना पोलिस कोठडी

धुळे । dhule प्रतिनिधी

खोटी ओळख सांगून (giving a false identity) अर्शद सलीम मलिक (Arshad Salim Malik)याने देवपूरातील तरूणीवर (Abuse of young woman)अत्याचार केले. तिला धमकावित उल्हासनगर येथे नेले. तेथेही तिचा छळ केला. तर अर्शदच्या पित्यानेही (Arshad's father) तिच्यावर अत्याचार (torture) केल्याची धक्कादायक घटना काल उघडकीस आली. याप्रकरणी पश्चिम देवपूर (West Deopur Police)पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पिता-पुत्राला अटक (Father and son arrested) केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

शहरातील एका 24 वर्षीय तरुणीने पश्चिम देवपूर पोलिस काल फिर्याद दाखल केली. त्यानुसार तिने शहरतील एका अकॅडमीमध्ये पोलिस भरतीचा क्लास लावला होता. तेव्हा अर्शद सलीम मलिक (रा. हाजी लुकमान शाळेजवळ, देवपूर) याने ओळख लपवून हर्षद माळी असे नाव सांगून तिच्याशी मैत्री केली. तिला लळिंग येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्याची चित्रफीत बनवून धमकावले.

त्यानंतर तिला उल्हासनगर येथे नेले. तेथेही अत्याचार केला. तर तरूणाचा पिता सलीम मलिक याने देखील तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. शिवीगाळ, दमदाटी करीत छळ केला. याबाबत पिडीत तरूणीने पश्चिम देवपूर पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक करीत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांची पोलिस कोठडीत रवानगी केली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com