साक्री पं.स.चा लाचखोर अभियंता गजाआड

धुळे एसीबीची कारवाई, साडेसात हजारांची घेतली लाच
साक्री पं.स.चा लाचखोर अभियंता गजाआड

धुळे । Dhule

धनादेश काढुन दिल्याच्या मोबदल्यात साडेसात हजारांची लाच (bribe) घेणार्‍या साक्री पं.स.च्या घरकुल बांधकाम विभागातील अभियंता वैभव हालोरे याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली.

प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत तक्रारदारास सन 2021-2022 मध्ये नागपुर (ता.साकी) गावात घरकुल मंजुर झाले होते. या घरकुलाचे फोटो काढून नजरी तपासणी करुन त्यांचे मुल्यांकन साकी पंचायत समिती कार्यालयात सादर करुन धनादेश काढुन दिल्याच्या मोबदल्यात साकी पंचायत समितीतील घरकुल बांधकाम विभागातील इंजिनिअर वैभव हिंमत हालोरे यांनी तक्रारदाराकडे 7 हजार 500 रुपये लाचेची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रारी अर्ज सादर केला होता. त्यानुसार आज एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. त्यात साक्री पं.स.चा कंत्राटी अभियंता वैभव हालोरे याने 7 हजार 500 रुपये लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम स्विकारतांना त्यांला रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण व राजन कदम, भुषण खलाणेकर, प्रशांत बागुल, भुषण शेटे, सुधीर मोरे, संतोष पावरा, शरद काटके, कैलास जोहरे, संदिप कदम, रामदास बारेला, गायत्री पाटील, रोहिणी पवार, वनश्री बोरसे, जगदिश बडगुजर यांच्या पथकाने केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com