साक्री नगरपालिका निवडणूक : 26 उमेदवारांचे अर्ज वैध, 7 जणांचे अर्ज अवैध

साक्री नगरपालिका निवडणूक : 26 उमेदवारांचे अर्ज वैध, 7 जणांचे अर्ज अवैध

साक्री ।Sakri । प्रतिनिधी

येथील नगरपालिकेच्या (Municipal Election) चार प्रभागांची निवडणूक प्रक्रिया सुरु असून आज अर्जांची छाननी (Scrutiny of applications) करण्यात आली. त्यात 26 जणांचे अर्ज वैध तर सात जणांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले.

नगरपालिकेच्या 17 पैकी 13 प्रभागांची निवडणूक झाली असून ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन स्थगित झालेल्या चार प्रभागांची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. आज अर्जांची छाननी तहसील कार्यालयात करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद दाणेज, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी देवेंद्रसिंह परदेशी, तहसीलदार प्रवीण चव्हाणके आदी उपस्थित होते.

प्रभाग क्र. 6 मध्ये चव्हाण निकीता भालचंद्र, ठाकरे चित्रा पंढरीनाथ, सोनवणे रेखा आबा, सोनवणे युगंधरा आबासाहेब, नेरकर तनिषा दिनेश, प्रभाग क्र. 12 मध्ये भिल मंगल रामभाऊ, सोनार भारती सुर्यकांत, भोसले शर्मिला गजेंद्र, पगारिया जयश्री विनोद, खैरनार माधुरी संदीप, नेरकर तनिषा दिनेश, प्रभाग क्र. 14 मधील आजगे शैलेंद्र भगवान, रामोळे राजेंद्र उत्तमराव, भोसले गजेंद्र रामराव, येवले प्रमोद भटू, भोसले अरविंद गोविंदराव, रामोळे अनिता राजेंद्र, कोठावदे दीपक शशिकांत, रामोळे राजेंद्र उत्तम, चंदेल प्रवीणसिंह त्र्यंबकसिंह आणि प्रभाग क्र. 17 मधील रामोळे प्रकाश बंडू, गीते बापू पुंडलिक, पिंजारी भटू दिलावर, गीते मनिष बापूसाहेब, पठाण नदीमखान याकुबखान, तांबोळी अकबर मुनाफ यांचे अर्ज वैध ठरविण्यात आले.

10 जानेवारीपर्यंत अर्ज माघारीची मुदत असून यानंतर निवडणूकीचे चित्र स्पष्ट होईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com