
धुळे । Dhule । प्रतिनिधी
शहरासह जिल्ह्यात ध्वनी डेसिबलचे प्रमाण ठरवून देण्यात आले आहे. त्यात औद्योगिक क्षेत्रात दिवसा 75, रात्री 70, वाणिज्य क्षेत्रात दिवसा 65, रात्री 55, निवासी क्षेत्रात दिवसा 55, रात्री 45 आणि शांतता क्षेत्रात दिवसा 50 तर रात्री 40 असे आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ध्वनी प्रदूषण (Noise pollution) नियम 2000 अंतर्गत जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात ध्वनी प्रदूषण (Noise pollution) प्राधिकार्याची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील (Superintendent of Police Praveen Kumar Patil) यांनी दिली आहे.
उच्च न्यायालयात महेश बेडकेर यांनी दाखल केलेल्या ध्वनी प्रदूषणबाबतच्या (Noise pollution) याचिकेवर दिलेल्या निर्णयात ध्वनी प्रदूषण नियम 2000 अन्वये रात्री दहा वाजेनंतर ध्वनिक्षेपकावर बंदी आणल्यानंतरही या कायद्याच्या उल्लंघनाची बाब समोर येत असल्यामुळे ध्वनी प्रदूषण कायद्याची आगामी सण, उत्सवादरम्यान प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिस विभागातर्फे ध्वनी प्रदूषण (Noise pollution) प्राधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची माहिती वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषण (नियम व नियंत्रण) नियम 2000 चे कलम 3 (1), 4 (1) तसेच पर्यांवरण संरक्षण अधिनियमातील कलम 6 अन्वये डेसीबलचे प्रमाण ठरवून देण्यात आले आहे. याबाबत वाद्य वाजकांनी त्याचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त एक लाख रुपये दंड व पाच वर्षांपर्यंत कारावास व उल्लंघन पुढे सुरू ठेवल्यास दर दिवशी पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच वाद्य वाजविताना त्यावर अश्लिल, निर्बंधित, आक्षेपार्ह गाणे वाजवू नये. रुग्णालये, शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये, न्यायालय परिसरात वाद्यांचा वापर करू नये.
डेसिबलचे प्रमाण (दिवसा, रात्री) औद्योगिक क्षेत्र, 75, 70. वाणिज्य क्षेत्र- 65, 55. निवासी क्षेत्र- 55, 45. शांतता क्षेत्र- 50, 40 असे आहे.
धुळे जिल्ह्यातील सनियंत्रण समितीवर अपर पोलिस अधीक्षक, धुळे- अध्यक्ष, पोलिस उपअधीक्षक (गृह), धुळे- सदस्य, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, धुळे, सदस्य हे आहेत.
जिल्ह्यात पोलिस ठाणेनिहाय ध्वनी प्रदूषण (Noise pollution) प्राधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, धुळे शहर, मोहाडी पोलिस निरीक्षक आनंद कोकरे, आझादनगर, चाळीसगाव रोड, पोलिस निरीक्षक मोतीराम निकम, देवपूर, पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर, पश्चिम देवपूर, पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, धुळे तालुका, सोनगीर, पोलिस निरीक्षक अजयकुमार चव्हाण, साक्री, निजामपूर, पिंपळनेर, पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, शिरपूर शहर, शिरपूर ग्रामीण, थाळनेर, पोलिस निरीक्षक सुनील भाबड, शिंदखेडा, नरडाणा, पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी, दोंडाईचा, पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, नियंत्रण कक्ष (संपूर्ण जिल्ह्यासाठी) यांचा त्यात समावेश आहे.
ध्वनी प्रदूषण तक्रारींचे निवारण न झाल्यास पोलिस उपअधीक्षक (गृह), धुळे, पोलिस अधीक्षक कार्यालय, धुळे यांच्याशी संर्पक करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
धुळे जिल्ह्यातील नागरिकांची ध्वनी प्रदूषणबाबतची (Noise pollution) तक्रार असल्यास नियुक्त करण्यात आलेल्या पोलिस ठाणे, जिल्हास्तरीय ध्वनी प्रदूषण प्राधिकार्यांशी संपर्क साधून तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन पोलिस अधीक्षक श्री. पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यात 8 मेपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश धुळे, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 24 एप्रिल ते 8 मे 2022 या कालावधीत प्रतिबंधात्मक मनाई आदेश मुंबई पोलिस कायदा कलम 37 (1) (3) अन्वये लागू राहतील अशी माहिती यांनी दिली आहे.
-प्रवीणकुमार पाटील, पोलीस अधिक्षक