Photo# धुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांना 512 कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरीत-मंत्री दादा भुसे

स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण, जिल्ह्यातील विकासकामांची दिली माहिती
Photo# धुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांना  512 कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरीत-मंत्री दादा भुसे

धुळे - प्रतिनिधी dhule

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी (Amrit Mahotsav) वर्षानिमित्त बलशाली भारताच्या निर्मितीत समाजाच्या सर्व घटकांनी योगदान द्यावे. शेतकरी (farmer) हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून यंदाच्या खरीप हंगामात धुळे (dhule) जिल्ह्यातील 44 हजार 865 शेतकऱ्यांना 512 कोटी रुपयांचे पीक कर्ज (Crop loan) वितरीत करण्यात आले आहे. आगामी रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वितरणाच्या सूचना बँकांना (Bank) सहकार विभागाच्या माध्यमातून दिल्या आहेत, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे (Minister Dadaji Bhuse) यांनी आज येथे केले. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा आज सकाळी आयोजित करण्यात आला होता.

मंत्री श्री.भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पोलिस दलाच्या तुकडीने मानवंदना दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर प्रदीप कर्पे, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक सहाचे समादेशक प्रल्हाद खाडे, महानगरपालिका आयुक्त देवीदास टेकाळे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे (Collector Trupti Dhodmise), सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले, कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा क्रीडाधिकारी आसाराम जाधव, उपजिल्हाधिकारी डॉ.अरविंद अंतुर्लीकर (निवडणूक), गोविंद दाणेज (रोहयो), उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे आदींसह स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी देशाचे संरक्षण करताना शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर मंत्री श्री. भुसे यांनी उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली. यावेळी ध्वजारोहणाच्या मुख्य सोहळ्यावर जिल्हा प्रशासन व फ्लाइंग क्लबच्या सहकार्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच केशरी, पांढरा आणि हिरव्या रंगाचे फुगे आकाशात सोडण्यात आले.

स्वातंत्र्याची चळवळ प्रेरणादायी

मंत्री श्री.भुसे म्हणाले, आजपासून बरोबर 75 वर्षांपूर्वी भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होवून स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित झाले. त्यासाठी भारतीयांना दीडशे वर्षे ब्रिटिशांशी संघर्ष करावा लागला. या काळात विविध आंदोलने झाली. स्वातंत्र्याच्या या यज्ञात अनेकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. शेवटी 1942 मध्ये ब्रिटिशांना ‘चले जाव’ करावे लागले. त्यानंतर 1947 मध्ये आजच्याच दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले.

भारताला मिळालेले स्वातंत्र्य केवळ भारतासाठी नव्हते, तर तिसऱ्या जगातील पारतंत्र्यातील सर्व देशांसाठी प्रेरणा देणारे होते.

स्वातंत्र्याच्या लढ्यात धुळ्याचाही सहभाग

देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक ज्ञात- अज्ञात वीरांनी योगदान दिले आहे. धुळे जिल्हाही स्वातंत्र्य लढ्यात योगदान देण्यात मागे नव्हता. जिल्ह्यातील चिमठाणे गावाजवळ क्रांतिकारकांनी ब्रिटिशांचा खजिना लुटला होता.

जंगल सत्याग्रह, विविध आंदोलनाच्या माध्यमातून या स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिशांना जेरीस आणले होते. धुळे जिल्हा कारागृहात आचार्य विनोबा भावे, क्रांतिवीर नागनाथ नायकवडी, पूज्य सानेगुरुजी, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना बंदिवान करण्यात आले होते. त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याबरोबरच गोवा मुक्ती संग्रामातही आपल्या जिल्ह्याने योगदान दिले आहे.

स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याचे स्मरण

भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय केंद्र सरकार आणि राज्य शासनाने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात आला आहे.

या उपक्रमास आपल्या जिल्हावासीयांनी दिलेला प्रतिसाद अभूतपूर्वच असा म्हणावा लागेल. या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याचे स्मरण होण्याबरोबरच आपला देशाभिमानही वाढला आहे.

जिल्ह्यात 75 अमृत सरोवर

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त धुळे जिल्ह्यात 75 अमृत सरोवरांची निर्मिती करण्यात येणार आहे. आतापर्यंत 20 सरोवरांचे काम पूर्णत्वास आले असून उर्वरित सरोवरांचे काम जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय लाभार्थ्यांना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनतेला प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रति व्यक्ती पाच किलो धान्य माहे सप्टेंबर 2022 अखेर मंजूर केले आहे. त्यानुसार दरमहा नियमित व मोफत धान्याचे वितरण करण्यात येत आहे. दरमहा एकूण 14 हजार 500 टन अन्नधान्याचे पात्र लाभार्थ्यांना वितरण करण्यात येत आहे. तसेच शिवभोजन योजनेचे 31 केंद्र सुरू आहेत. त्या माध्यमातून रोज सरासरी 2 हजार 800 थाळ्यांचे वितरण होत आहे.

आतापर्यंत 15 लाख 10 हजारांपेक्षा जास्त गरजूंनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

कोविड प्रतिबंधक लस घ्या

गेली दोन वर्षे कोरोना विषाणूने आपल्याला बंदिस्त करून ठेवले होते. मात्र, कोविड लसीकरणाने त्याची तीव्रता कमी केली. त्यामुळेच आज आपण मोकळा श्वास घेवू शकत आहोत. मात्र, आजही अनेकांनी पहिला, दुसरा किंवा बूस्टर डोस घेतलेला नाही. त्यांनी कोविड लसीकरण करून घेत सुरक्षित व्हावे. केंद्र सरकारतर्फे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 दिवस मोफत बूस्टर डोस देण्यात येत आहेत. त्याचाही लाभ पात्र नागरिकांनी घ्यावा. यंदा जिल्ह्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील लहान- मोठे प्रकल्प भरत आले आहेत. आतापर्यंत सरासरीच्या 80 टक्के पाऊस झाला असून पावसाचा आणखी दीड महिना कालावधी शिल्लक आहे. समाधानकारक पावसामुळे यंदाच्या खरीप हंगामात चार लाख हेक्टर क्षेत्रात विविध पिकांचा पेरा झाला आहे. शेतकऱ्यांना रासायनिक खते आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वर्षाला 6 हजार रुपये त्यांच्या बचत खात्यात जमा केले जातात. आपल्या जिल्ह्यात पीएम किसान योजनेचे एकूण दोन लाख 8 हजार 360 लाभार्थी आहेत.

तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याचाही निर्णय आमच्या शासनाने घेतला आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर

यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस पडत आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनडीआरएफ च्या मदतीच्या दुप्पट रक्कम नुकसानग्रस्तांना देण्याचा आणि दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत ही मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात ई-पीक पाहणी कार्यक्रम सुरू केला आहे. ई-पीक पाहणीच्या सुलभीकरणासाठी शासनामार्फत नवीन ॲप व्हर्जन-2 विकसित केले आहे.

या नवीन प्रणालीत सहभागी होवून शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी कार्यक्रमात सहभागी व्हावे. लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनीदेखील या प्रक्रियेत सहभाग नोंदवून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, असेही आवाहन मंत्री श्री. भुसे यांनी केले.

जिल्ह्यात 16 हजार घरकुलांना मंजुरी

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेंतर्गत सन 2021- 22 या आर्थिक वर्षांत 16 हजार 15 घरकुलांना मंजुरी देण्यात आली. यात धुळे जिल्ह्याने नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सन 2016- 17 ते 2021- 22 अखेर 40 हजार 939 घरकूल पूर्ण करण्यात आले आहे. शबरी आवास योजनेंतर्गत सन 2021- 22 मध्ये 1490 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. रमाई ग्रामीण आवास योजनेंतर्ग तीन हजार घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून 1 हजार 918 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.

पायाभूत सोयीसुविधांच्या निर्मितीवर भर

धुळे जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, दळण- वळण, औद्योगिक विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. जिल्हा वार्षिक योजना 2022- 23 मध्ये सर्वसाधारणसाठी 236 कोटी रुपये, आदिवासी घटक कार्यक्रमासाठी 118 कोटी रुपये, तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 30 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर आहे. या माध्यमातून पायाभूत सोयीसुविधा बळकटीकरणार भर देण्यात येत आहे.

मा.भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीतील विद्यमान मतदारांच्या प्रमाणिकरणासाठी आधार क्रमांकासह माहिती संग्रहित करण्याची मोहीम एक ऑगस्ट 2022 पासून सुरू केली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व मतदारांचे आधार क्रमांक हे बीएलओंमार्फत ऑनलाईन ॲपद्वारे आधार लिंक करण्याची मोहीम सुरु केलेली आहे.

या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व मतदारांनी सहभाग नोंदवावा. राज्यातील शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. मात्र, त्यासाठी आपल्या सहकार्याचीही गरज आहे. आपण, सर्वजण वेळोवेळी सहकार्य करीत आले आहेत.

गुणवंतांचा झाला सत्कार

यावेळी मंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार झाला. त्यात जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित मैदानी, मॅरेथान, सायक्लोथॉन व वॉकेथान स्पर्धेतील विजेत्यांचा समावेश होता. त्यांची नावे अशी (अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय या क्रमाने) : मॅरेथान खुला गट (पुरुष) : शरद विजय अहिरे, नीलेश हिंमत माळी, सागर रवींद्र माळी. मॅरेथॉन खुला गट (महिला) : निकिती उत्तम थोरात, कल्याणी भारमल चव्हाण, पूनम खंडू माळी. सायक्लोथॉन 20 वर्षांआतील मुले : नयनकुमार रवींद्र पाटील, प्रणय राजेश चौरसिया, समर्थ संजय पाटील. सायक्लोथॉन 20 वर्षांवरील पुरुष : ऋषिकेश जगदीश सोनवणे, नकुल सुरेश अहिरराव, योगेश्वर राजेंद्र भदाणे. सायक्लोथॉन 20 वर्षांआतील मुली- रोशनी विठ्ठल पाटील, प्राजक्ता प्रशांत मराठे, बबिता प्रदीप येलपले.

सायक्लोथॉन 20 वर्षांवरील महिला- मनीषा कमलेश पाटील. वॉकेथॉन (पुरुष) : करण भुरा धारवे, मनोज संजय माळी, सागर निंबा कन्नोर. वॉकेथॉन (महिला) :बालमना अशोक चव्हाण, कल्याणी भारमल चव्हाण, कल्याणी शालिकराव पवार. एकत्रित महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे व श्री सिद्धेश्वर हॉस्पिटल, धुळे, महाआवास अभियान 2021- 22 अंतर्गत सर्वोत्कृष्ट तालुका, क्लस्टर, ग्रामपंचायतींना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्यात आले. त्यांची नावे अशी : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण- सवोत्कृष्ट तालुका- शिरपूर, धुळे, शिंदखेडे.

क्लस्टर – नगाव, ता.धुळे, जैताणे, ता. साक्री, भाटपुरा, ता. शिरपूर. ग्रामपंचायत- आर्वी, ता. धुळे, हट्टी खुर्द, ता. साक्री, सुराय, ता. शिंदखेडे. राज्यस्तरीय योजना- ग्रामीण (रमाई, शबरी व पारधी) : सवोत्कृष्ट तालुका शिरपूर, साक्री, धुळे. सर्वोत्कृष्ट क्लस्टर– देऊर बुद्रुक, ता. धुळे, शेवाळे, ता. शिंदखेडे, चरणमाळ, ता. साक्री. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत- भामेर, ता. साक्री, डांगुर्णे, ता. शिंदखेडे, भटाणे, ता. शिरपूर. स्व्च्छ विद्यालय पुरस्कार- एसईएस प्राथमिक आश्रमशाळा. जगदीश देवपूर, वाहिद अली सय्यद यांनी सूत्रसंचालन केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com