शहरातील विकासात रोटरीचा महत्वाचा सहभाग -आ.जयकुमार रावल

दोंडाईचा येथे रोटरी दिनदर्शिकेचे विमोचन
शहरातील विकासात रोटरीचा महत्वाचा सहभाग -आ.जयकुमार रावल

दोंडाईचा Dondaicha । प्रतिनिधी

शहरातील सामाजिक उपक्रमात अग्रसेर असलेली संस्था रोटरी (Rotary) सिनियर्सच्या दिनदर्शिकेचे (Calendar) विमोचन आ.जयकुमार रावल (MLA Jayakumar Rawal) यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष राजेश माखीजा, माजी अध्यक्ष तथा प्रो.चेअरमन चेतन सिसोदिया, सचिव अँड नितीन अयाचीत, रोटरीचे जेष्ठ सदस्य डॉ.मुकुंद सोहनी, उद्योजक सुरेश जैन, भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन, नगरसेवक निखिल जाधव, जितेंद्र गिरासे आदी उपस्थित होते.

यावेळी जयकुमार रावल यांनी सांगितले की, रोटरीचे कार्य शैक्षणीक क्षेत्रात रोटरी स्कुल, करीयर गाइडन्स सेंटर तसेच वैद्यकीय सेवेत डोळ्यांचे हाँस्पीटल, जयपुर फुट, गरजुंना कुत्रिम हात, जन्मत मतीमंद रुग्णांची काँक्लियर शस्त्रक्रिया, गरजुंना अर्थिक पुरवठा करण्यासाठी रोटरी पतपेढी यासोबतच शहरात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी वृक्ष लागवड असे अनेक प्रकारे रोटरीच्या माध्यमातून जनतेची सेवा होत असते. म्हणून शहराच्या विकासात रोटरीचे मोठे योगदान असल्याचे आ.रावल यांनी सांगितले.

प्रास्ताविक करतांना संजय छाजेड यांनी सांगितले की, आ.जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाने, नगराध्यक्षा नयनकुँवर रावल यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व सभापती व नगरसेवक यांच्या प्रयत्नातून शहराचा सर्वांगीण विकास करत आकर्षक अशा राजपथाची निर्मिती, कायमस्वरूपी प्रेरणा देणारे स्मारके, नियमीत व शुद्ध पाणीपुरवठा करणारी नविन योजना, शहरातील 57 ओपनप्लेसचे सूशोभिकरण, शहरातील सर्व मुख्य रस्ते डांबरीकरण व काँक्रिटचे बांधुन शहरातील सर्व कचरा नियमीत संकलीत करुन प्रक्रिया करणारा प्रकल्प, नदीच्या दुतर्फा रस्ते करुन सौंदयीकरण करुन संवर्धन करण्यात आले.

रोटरी सिनियर्सतर्फे आ. जयकुमार रावल यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला. सोबत पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवुन नविन 21 कोटींची योजना कार्यान्वित करण्यासाठी कष्ट घेणारे प्रविण महाजन व बांधकाम विभागात अनेक रस्ते बांधून ओपनप्लेसचे सूशोभिकरण करणारे निखिल जाधव यांचा देखील सन्मान करण्यात आला.

चेतन सिसोदीया यांनी रोटरीच्या दिनदर्शिकेची माहिती दिली. कार्यक्रमात दिनदर्शिकेसाठी आर्थिक मदत करणार्‍या दात्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप जाधव, खान्देश मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजन मोरे, न्यु खान्देश मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अख्तर शाह यांचा सन्मान रोटरी सिनियर्सतर्फे करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अनिकेत मंडाले यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी नामदेव थोरात, हुसेन विरदेलवाला, रविंद्र पाटील, डॉ.अनिल धनगर, डॉ.राजेंद्र पाटील, राजेंद्र परदेसी, चेतन जैन, विजय अडगाळे, अमन जयस्वाल, अनुराधा सोहनी, सुमित जैन, के.टी.ठाकुर, महेंद्र चोपडा, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष दिनेश कर्नावट, राधेश्याम लखोटे आदींनी परिश्रम घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com