निफाडच्या व्यावसायिकाला लुटले

अजनाळेतील घटना, 15 जणांवर गुन्हा
निफाडच्या व्यावसायिकाला लुटले

धुळे । Dhule

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील व्यावसायीकाला कॉपर तार खरेदीसाठी बोलावून त्यांच्यासह साथीदाराला बेदम मारहाण करत त्यांच्याकडील साडे तीन लाखांची रोकड व दागिने लुटण्यात आले. काल काल भरदुपारी ही घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात 15 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मोहम्मद आरीफ सलीम पटेल (वय 28 रा. पिंपळगाव बसवंत) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्याचा भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून त्यांना सुरेश भोसले व मुकेश भोसले या दोघांनी कॉपर तार देता, असे सांगून विश्वास संपादन केला. तार खरेदी करण्यासाठी काल दि. 17 रोजी दुपारी अजनाळे (ता. धुळे) येथे बोलाविले. त्यानुसार व्यावसायीक पटेल हे साथीदारासह दोन वाजता अजनाळे येथील हॉटेल शिवजवळ आले.

तेव्हा तेथे सुरेश भोसले, मुकेश भोसलेसह त्यांच्या पंधरा साथीदारांनी त्यांना लोखंडी रॉड व हाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. त्यांच्याकडील 3 लाख 50 हजारांची रोकड व सोनसाखळी, सोन्याची अंगठी व चांदीचा ऐवज असा एकुण 3 लाख 72 हजारांचा मुद्येमाल जबरीने चोरून नेला. या मारहाणीत पटेल हे जखमी झाले. याबाबत त्यांनी मालेगाव येथील रमजानपुरा पोलिस ठाण्यात कैफियत मांडली.

तेथून फिर्याद तालुका पोलिसांना प्राप्त झाली असून त्यावरून सुरेश भोसले, मुकेश भोसले, चॅम्पीयम, सिकेश, आकेश, भैय्या, रघू, उलेश, संजय, गोरख व इतर चार ते पाच जण सर्व (रा. अजनाळे व परिसर ता. धुळे) यांच्याविरूध्द भांदवि कलम 395, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सागर काळे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com