अमरावती नदी पुलाजवळील रस्ता दुरुस्तीला मुहूर्त मिळेना

दोंडाईचा भाजपच्या रास्ता रोको आंदोलनाला प्रशासनाची केराची टोपली
अमरावती नदी पुलाजवळील रस्ता दुरुस्तीला मुहूर्त मिळेना

दोंडाईचा Dondaicha । श.प्र

शहरातील अमरावती नदी पुलाजवळील (Amravati river bridge) रस्त्यावर भले मोठे खड्डे (Large pits)पडले आहेत. हे खड्डे बुजविण्यासाठी संबधीत प्रशासनाला मुहुर्त (Moment to administration) मिळत नसल्याचे दिसत आहे. याच रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी भाजपाने (bjp) दोन महिन्यापूर्वी रास्तारोको आंदोलन (Rasta Roko Andolan) केले होते. मात्र आंदोलनाला प्रशासनाने केराची टोपली दाखविली आहे.

शहराबाहेरील नंदुरबारकडून येणारी वाहने धुळे, मालेगाव, नाशिक, मुंबई, पुणे शहराकडे जाणार्‍या वाहन धारकांना दोंडाईचा शहरातील अमरावती नदी पुलाजवळील भल्या मोठ्या खड्डयातून कशीबशी वाट काढवी लागते. दररोज खड्डयात वाहन जावून लहान-मोठे अपघात घडत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग दुरुस्ती करण्यासाठी एक दुसर्‍यावर टोलवाटोलवी करत असल्याचे समजते. या रस्त्यावर खड्डयात पडल्यावर अपघात होऊन एखाद्याचा जिव जाईल तेव्हा संबधीत प्रशासनाला जाग येईल का? असा सवाल यानिमित्त उपस्थित होत आहे.

हे खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी दोन महिन्यापूर्वी सप्टेंबर महिन्यात दि. 9 रोजी गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला दोंडाईचा शहर भाजपाच्या वतीने शहराध्यक्ष प्रविण महाजन आणि युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राजू धनगर यांच्या नेतृत्वाखाली त्या पुलावर बसून रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी शहराध्यक्षांनी संबंधित बांधकाम अभियंता तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांची भ्रमणध्वनीवरून चर्चा करून रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिले होते. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र आठ दिवसाच्या आत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास गणेशोत्सवाच्या विसर्जनानंतर मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा शहराध्यक्ष श्री.महाजन यांनी दिला होता. मात्र दोन महिने उलटून देखील त्या ठिकाणी रस्ता दुरुस्त झाला नसून नागरिकांचे अतोनात हाल होत आहे. भाजपाच्या आंदोलनाला प्रशासनाने केराची टोपली दाखवत खड्डे भरण्याची तसदी घेतली नाही. मात्र भाजपाचे रास्तारोको आंदोलन हे केवळ प्रसिद्धीसाठी करण्यात आल्याचे शहरात बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com