रिक्षाचालकाचा लाटीपाडा धरणात बुडून मृत्यू

रिक्षाचालकाचा लाटीपाडा धरणात बुडून मृत्यू

पिंपळनेर । Pimpalner । वार्ताहर

येथील गोपाल नगर मधील रिक्षाचालक (Rickshaw driver) हा गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता (Disappeared) होता त्याचा मृतदेह (Corpses) लाटीपाडा धरणात (Latipada dam) आढळून आला. याबाबत पिंपळनेर पोलिसात (police) अकस्मात मृत्यूची (Death) नोंद करण्यात आली आहे.

साहेबराव माधवराव पगारे (Sahebrao Madhavrao Pagare) (वय 47) असे मयत रिक्षा चालकाचे नाव आहे. तो दि. 4 एप्रिलपासून घरातून बेपत्ता होता. त्यामुळे त्यांची नातेवाईकांनी (relatives) शोधाशोध सुरू केली त्यावेळी त्याचे कपडे (Clothes) लाटीपाडा धरणा जवळ (Latipada dam) काढून ठेवलेले आढळून आले. याबाबत राहुल प्रकाश पगारे यांनी पिंपळनेर पोलिसात माहिती दिली. त्या माहितीवरून पिंपळनेर पोलिसांनी धरणात त्याची शोधाशोध सुरू केली. मात्र तो मिळून आला नाही.

मात्र धरणावर काढून ठेवलेले कपडे नातेवाईकांनी ओळखल्यामुळे हे कपडे साहेबराव याचेच आहे असा निकष लावण्यात आला. त्यामुळे मालेगाव येथील पानबुडी शोध पथकाने (Submarine search squad) धरणात शोध मोहीम सुरू केली. त्यानंतर दि. 7 मार्च रोजी साहेबराव याचा मृतदेह (Corpses) पथकाच्या हाती लागला. त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी (relatives) हा मृतदेह साहेबराव याचा असल्याचे सांगितले.

तो कपडे काढून अंघोळीसाठी धरणात उतरला असावा व खोलपाण्यात बुडुन (Drowning) त्याचा मृत्यु झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी सदर मृतदेह (Corpses) शवविच्छेदनासाठी पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. शवविच्छेदना (Autopsy) नंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्यावर पिंपळनेर येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले. याबाबत पिंपळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास एएसआय पी.डी. अमृतकर हे करीत आहेत. त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी, 2 मुली असा परीवार आहे.

Related Stories

No stories found.