आढावा बैठकीत रेमडेसिव्हीर औषधाचा मुद्दा गाजला

आढावा बैठकीत रेमडेसिव्हीर औषधाचा मुद्दा गाजला

दोंडाईचा - Dondaicha - श.प्र :

येथील नगरपंचायतीच्या सभागृहात पालकमंत्री ना. अब्दूल सत्तार यांनी आज कोरोनाबाबत आढावा बैठक घेतली. त्यात रेमडेसिव्हीर औषधाचा मुद्या गाजला.

दोन दिवसांपासून या औषधाचा तुटवडा भासत असून ते तत्काळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यावेळी लोकप्रतिनिधींनी केली. दरम्यान ना. सत्तार यांनी बैठकीनंतर दोन दिवसांपुर्वी जमावाच्या हल्लयात ठार झालेल्या मयताच्या कुटूंबियांची भेट घेत त्याचे सांत्वन केले.

जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अब्दूल सत्तार हे आज जिल्ह्या दौर्‍यावर होते. त्यांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेवून आवश्यक त्या सुचना दिल्या. त्यानंतर सायंकाळी दोंडाईचा नगरपंचायत सभागृहात आढावा बैठक घेतली.

यावेळी माजीमंत्री तथा विद्यमान आ. जयकुमार रावल, जिल्हाधिकारी संजय यादव, पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित, जि.प.च्या सीईओ वान्मती सी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, प्रांतधिकारी विक्रमसिंह बांदल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने, तहसीलदार सुनील सैंदाणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भुषण मोरे, मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम, पोलीस निरीक्षक सुनील भाबड, वैद्यकीय अधिक्षक डॉ. ललिकुमार चंद्रे, शिंदखेडा कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. हितेंद्र देशमुख, उपनगराध्यक्ष नबु पिंजरी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, सेनेचे हेमंत साळुंखे, अतुल सोनवणे, नगरपरिषदेचे आरोग्य सभापती प्रतिनिधी कृष्णा नगराळे, जितेंद्र गिरासे, नगरसेवक हितेंद्र महाले, खलिल बागवान, राष्ट्रवादीचे अँड एकनाथ भावसार, संजय अग्रवाल, राकेश अग्रवाल आदी उपस्थित होते.

बैठकीत ना. सत्तार यांनी कोरोनास्थितीचा आढाव घेतला. यावेळी लोकप्रतिनिधींची शहरात रेमडिसिव्हीर औषधाचा तुटवडा भासत आहे. त्याअभावी अनेकांचा जिव जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे औषधाचा साठा तत्काळ उपलब्ध करू द्यावा, अशी मागणी केली.

तसेच शाहबाशहा खूनप्रकरणी आरोपींना अद्याप अटक का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर ना. सत्तार यांनी औषधसाठा लवकरच उपलब्ध केला जाईल.

त्यानंतर ना. सत्तार यांनी सभागृहातच शाहबाशहा यांच्या कुटूबियांची भेट घेत त्याचे सांत्वन केले. या घटनेची चौकशी पुर्ण होत नाही तोेपर्यंत कोणीही दोषी राहिल्यास त्याची गय केली जाणार नाही. पोलीसांचे पथक काम करत आहे. खूनप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com