छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

शिवसेनेतर्फे कार्यक्रम; चौकाचौकांत प्रतिमांचे पूजन, भगवे ध्वज लावल्याने शहरासह परिसर भगवामय
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

धुळे ।Dhule प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची तिथी नुसार जयंती (Jayanti) आज मोठ्या उत्साहात शहरासह जिल्हाभरात साजरी (Celebration) करण्यात आली. शिवसेनेसह विविध संघटनांनी सुध्दा शिवजयंती साजरी केली. यामुळे पुन्हा एकदा धुळे शहर भगवामय झाले.

शिवसेनेच्या (Shiv Sena) वतीने सकाळी आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून विधीवत पुजन (Ritual worship) करण्यात आले. तसेच शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. तुळशिराम गावीत, महानगरप्रमुख मनोज मोरे, सतिष महाले, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, डॉ. सुशिल महाजन, गुलाब माळी, धिरज पाटील, विनोद जगताप, संदीप सुर्यवंशी, संजय वाल्हे, रवि बेलपाठक, डॉ. महेश घुगरी, कैलास मराठे, प्रफुल्ल पाटील, नगरसेविका ज्योत्सना पाटील, भरत मोरे, आदी उपस्थित होते.

शिवसेनेतर्फे शहरातील विविध चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात भगवे झेंडे (Saffron flags) आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे फलक लावण्यात येवून चौका चौकात शिव पुजन (Shiva Pujan) कार्यक्रम पार पडला. शहरातील झाशी राणी चौकात भव्य महालाची प्रतिकृती उभारण्यात आली. येथे अश्वारुढ शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवून तेथे अभिवादनासह सायंकाळी वाजत गाजत शिव जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यामुळे वातावरणात उत्साह भरल्याचे जाणवले.

महापालिका आयुक्तांच्या (Municipal Commissioner) दालनात लावण्यासाठी छ.शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा (Image) देण्यात आल्या. शिवसेनेने वतीने या प्रतिमा भेट दिल्या.

यावेळी जिल्हाप्रमुख डॉ.तुळशिराम गावीत, महानगरप्रमुख मनोज मोरे, सतिष महाले, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, डॉ. सुशिल महाजन, गुलाब माळी, धिरज पाटील, विनोद जगताप, संदीप सुर्यवंशी, संजय वाल्हे, रवि बेलपाठक, डॉ. महेश घुगरी, कैलास मराठे, प्रफुल्ल पाटील, नगरसेविका ज्योत्सना पाटील, भरत मोरे, आदी उपस्थित होते.

दरवर्षी शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवरायांची तिथीप्रमाणे जयंती साजरी केली जाते. याप्रमाणे पुन्हा एकदा शिवप्रेमींमध्ये आनंद आणि उत्साह संचारल्याचे आढळून आले. ठिकठिकाणी भगवे झेंडे लावल्याने परिसर भगवामय झाला. छत्रपतींच्या पोवाड्यांनी परिसर दुमदुमला. चौका चौकात शिवप्रतिमांचे पूजन करुन स्वराज्याच्या मालकाला अभिवादन करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com