आरक्षण, पुनर्रचनेमुळे सुरक्षित प्रभाग शोधण्याची वेळ

दोंडाईचा नगर परिषद; उमेदवार देतांना सर्वच राजकीय पक्षांची कसरत होणार
 दोंडाईचा नगर परिषद
दोंडाईचा नगर परिषद

समाधान ठाकरे

दोंडाईचा Dondaicha ।

महिला आरक्षण (women's reservation) सोडतीनंतर आधीच नव्या प्रारूप प्रभाग रचनेमुळे (new model ward structure) अनेक इच्छुक दिग्गजांसह नेत्यांवर (leaders with veterans) सुरक्षित प्रभाग शोधण्याची वेळ (Time to find a safe ward) येऊन ठेपली आहे.

आरक्षण सोडतीमुळे राजकीय उलथापालथीची चर्चा सुरू झाली आहे. विद्यमान नगरसेवकांपैकी काहींना त्यांच्या पत्नीला निवडणूकीच्या रिंगणात उतरवावे लागणार आहे. आधीच स्वतःला भावी नगरसेवकांची (future corporators) उपाधी लावणार्‍यांची गर्दी तसेच दिग्गजांना नवीन प्रभाग शोधावा लागणार असल्याने आगामी काळात शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना (NCP, Congress and Shiv Sena) हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक (Election) लढवतात की स्वतंत्रपणे याबद्दल महाविकास आघाडीने अद्याप पर्यंत स्पष्ट भूमिका मांडली नसली तरी अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रितपणे निवडणूक लढवावी, असे मत व्यक्त केले आहे.

इच्छूकांची व भावी नगरसेवकांची लक्षणीय संख्या पाहता सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना उमेदवार ठरविताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अनेक विद्यमान नगरसेवकांसाठी अडचणीचे ठरणार असल्याची चर्चा सोडत जाहीर झाल्यानंतर शहरात रंगत होती. जाहीर झालेल्या महिला आरक्षणामुळे (Women's reservation) अनेकांच्या दांड्या गुल झाल्या आहेत. जिथे खुली जागा अपेक्षित होती तेथे महिलांसाठी जागा आरक्षित झाल्याने अनेकजण नाराज झाले आहेत. विद्यमान नगरसेवकांपैकी अनेक नगरसेवकांना त्यांच्या घरातील महिलांना निवडणूक रिंगणात उतरवावे लागणार आहे.

नगर परिषदेची (Municipal Council) आरक्षण सोडत (Leaving the reservation) काढण्यात आली असून 13 प्रभागातून 26 सदस्य निवडले जाणार असून त्यापैकी दोन अनुसूचित जाती, दोन अनुसूचित जमाती, चार तसेच एकूण 13 महिला निवडल्या जाणार असल्याने यंदा नगर परिषदेत महिला राज राहणार आहे. या निवडणूकीत पुन्हा नव्याने द्विसदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अनेक भावी नगरसेवकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. असे असले तरी माजी व विद्यमान नगरसेवकांना मात्र यंदाची निवडणूक लढवितांना सोबतचा सहकारी हा विशेष कर्तृत्ववान व राजकीयदृष्ट्या चाणाक्ष सर्व बाजूने संपन्न असणारा हवा असल्याने त्यादृष्टीने इच्छुकांनी महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. अनेक प्रभागांमध्ये विद्यमान दोन्ही सदस्यांमध्ये संवादाचा अभाव असल्याने त्याचा फटका आगामी निवडणुकीत होऊ नये यासाठी सुरक्षित प्रभाग शोधण्यासह राजकीय पक्षाकडून तिकीट मिळवून निवडणूक लढविण्याचा कल इच्छुकांमध्ये वाढत असल्याने त्यादृष्टीने त्यांनी विविध पक्षाच्या नेत्यांकडे फिल्डिंग (Fielding to leaders) लावणे सुरू केले आहे.

एकूणच आरक्षण जाहीर झाल्यानंतर कही खुशी कही गम अशी परिस्थिती इच्छुक विद्यमान व भावी नगरसेवकांची झाली असल्याने आगामी कालावधीत शहरातील राजकीय परिस्थिती कशी राहील? याबाबत चौकाचौकात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. पालिकेची आगामी निवडणूक ही द्विसदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहे..

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com