व्यापाऱ्यांना दिलासा ; अवजड वाहने प्रवेशबंदीच्या आदेशात तीन तास सूट

व्यापाऱ्यांना दिलासा ; अवजड वाहने प्रवेशबंदीच्या आदेशात तीन तास सूट

धुळे - प्रतिनिधी dhule

शहरातील वाहतुकीची वाढती कोंडी, (Traffic rules) वाहतुक नियमनाचे वाढती समस्या दूर होण्यासह शहरातील वाहतुक व्यवस्था (Transportation arrangements) सुरळीत व सुरक्षित रहावी, मोटार वाहनांची वाढती गर्दी व त्यामुळे रस्त्यावर घडणारे अपधात कमी व्हावे, याकरीता अवजड वाहनांना (Heavy vehicles) शहरात प्रवेशबंदी करीता जाहीरनामा काढण्यात आला आहे

याबाबत नुकतेच नागरीक, (Merchant) व्यापारी यांनी निवेदन दिले होते. त्यानुसार त्यात बदल करून (Superintendent of Police Pravin Kumar Patil) पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील सुधारीत आदेश पारीत केले आहे. इंदूरकडुन येणारे सर्व अवजड वाहनांना नगांवबारी पासून धुळे शहरात सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत प्रवेशबंदी राहील.

साक्रीरोड (surat) सुरतकडुन येणारे अवजड वाहनांना कृष्णाई हॉटेल साक्री बायपासपासुन धुळे शहरात सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत प्रवेशबंदी राहील. मुंबई कडुन धुळे शहरात गुरुद्वारा कडुन येणारे अवजड वाहनांना नवीन डीमार्टपर्यंत प्रवेश राहील त्यापुढे सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत प्रवेशबंदी राहील. चाळीसगाव क्रॉस, शंभर फुटी कॉर्नर पासुन अवजड वाहनांना धुळे शहरात सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपावेतो प्रवेशबंदी राहील. पारोळा चौफुली, कृषि महाविद्यालयपासुन अवजड वाहनांना धुळे शहरात सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपावेतो प्रवेशबंदी राहील.

तसेच बिलाडी रोड, जुने धुळे, वरखेडी रोड, वडजाई रोड, चितोड रोड, गोंदुर रोड व नकाणे रोडपासुन धुळे शहरात येणारे अवजड वाहनांना सकाळी 9 ते रात्री 9वाजेपर्यंत प्रवेशबंदी राहील. हा आदेश शासकीय वाहनांना तसेच राज्य परीवहन महामंडळाचे बसेस यांना लागु होणार नाही. तसेच शेतकरी यांची कृषि उत्पन्न बाजार समितीकडे धान्य सामान व पशुधन वाहुन

नेणारी वाहने तसेच शहरात येणारे फळे व नाशवंत वस्तुंची वाहने यांना देखील हा आदेश लागु होणार नाही. शहरात किराणा/भुसार व इतर जिवनावश्यक वस्तु तसेच बांधकाम साहित्य पुरविणारे वाहनाना दुपारी 12 ते 3 वाजेदरम्यान सदर आदेशातुन सुट देण्यात आली आहे. बंदीच्या वेळे व्यतिरिक्त अवजड वाहनांची वाहतुक नेहमी प्रमाणे राहील. हा सुधारीत जाहीरनामा दि.१६ मार्च ते दि. १७ एप्रिल रोजीपर्यंत प्रायोगिक तत्वावर एक महिन्यापर्यंत राबविण्यात येत आहे. तरी नागरीक, रहिवाशी, मोटार वाहन चालकांनी व जनतेने नमुद बदल केलेल्या वाहतुक नियोजनास सहकार्य करावे. तसेच अजुनही आपल्या हरकती, सुचना असल्यास लेखी स्वरुपात पोलीस निरीक्षक, शहर वाहतुक नियंत्रण शाखा किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याकडे पाठवाव्यात. प्राप्त झालेल्या सुचनांचे अवलोकन केल्यानंतर वाहतुक नियोजनात योग्य ते बदल करण्यात येतील, असेही कळविण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com