रेशन दुकानदारांनी ‘ई-पॉस’ केले जमा

तांत्रिक समस्येमुळे ग्राहकांचा रोष; वारंवार मागणी करूनही समस्या दखल न घेतल्याने केले आंदोलन
रेशन दुकानदारांनी ‘ई-पॉस’ केले जमा

धुळे । Dhule प्रतिनिधी

शासनाने रेशन दुकानदारांना (ration shopkeepers) दिलेल्या ई-पॉस मशीनचा(e-pos machine) जेवढा फायदा आहे, तेवढ्याच अडचणीही वाढल्या आहेत. तांत्रिक समस्येमुळे (Technical issues) रेशन दुकानदारांविरोधात ग्राहकांचा (customers) रोष आणि असंतोष वाढत चालला आहे. ही समस्या सोडविण्याची वारंवार मागणी करूनही अद्याप दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आज संतप्त रेशन दुकानदारांनी मोर्चाे (Morcha) काढून तहसील कार्यालय (Tehsil Office) आपले ई-पॉस जमा केले. जोपर्यंत अडचणी सोडविणार नाही तोपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा इशारा धुळे तालुका स्वस्त धान्य दुकानदार सेवा संस्थेचे (Cheap Grain Shopkeeper Service Organization) जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी दिला आहे.

याबाबत प्रशासनाला निवेदनही (Statement) देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, सध्या महाराष्ट्रामध्ये तसेच संपूर्ण देशातच आधार सर्व्हरला सतत येत असलेल्या तांत्रिक समस्येमुळे तसेच आधार संलग्न सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत (Public distribution system) एनआयसी नवी दिल्ली आणि हैदराबाद येथील सर्व्हरवर (Server) येत असलेल्या अतिरिक्त ताणामुळे मागील दोन-तीन महिन्यांपासून राज्यातील पॉस मशीनव्दारे होणारे धान्य वितरण(Grain distributio). विस्कळीत झाले आहे. धान्य वितरण थांबलेले असून शिधापत्रिकाधारकांमध्ये रेशन दुकानदारांविरोधात रोष वाढत आहे. तसेच राज्य शासनाच्या साखळी-व्यवस्थापन परिपत्रकानुसार राज्यात काम सुरु नसून दुकानदारांना दरमहा 15 ते 20 तारखेच्या पुढे धान्य वाटप सुरु होते. एससीएम प्रणालीतंर्गत असलेल्या अडचणीही (Difficulties too) आपल्या कार्यालयाकडून सोडविण्यात येत नाहीत किंवा त्याबाबत चर्चाही करण्यात येत नाही.

धान्य दुकानावर दरमहा धान्य उशिरा येते व धान्य आल्यावर देखिल ई-पॉस मशीनमध्ये धान्य साठा लवकर उपलब्ध होत नाही. म्हणून दुकानात धान्य असून दुकानदार धान्य वाटप करू शकत नाही आणि त्यामुळे लाभार्थी व दुकानदार यांच्यात नेहमी वादविवाद (Debate) होत आहेत. म्हणून ज्या तारखेला धान्य दुकानात आले त्यांच दिवशी ई-पॉस मशिनमध्ये धान्यसाठा (Grain stocks) उपलब्ध झाला पाहिजे.

माहे डिसेंबर 2021 पासून सर्व्हरला अनेकवेळा अडचणी येत आहे. धान्य वाटप करत असतांना एका कार्ड धारकाला केव्हा केव्हा एक तास देखील लागतो. त्यामुळे कंटाळून कार्डधारक घरीत जातात व दुकानदारांना अरेरावी भाषा वापरतात. नंतर तो कार्डधारक (Cardholder) येण्यास देखील कंटाळा करतो. नंतर मोफत व विकत धान्य एकाच वेळी मागणी देखील करतो.

त्यामुळे दुकानदारांमध्ये धान्य वाटपाची टक्केवारी फक्त 70 ते 75 टक्केच वाटप होते. म्हणून ई-पॉस मशिन संदर्भात मागील डिसेंबर-2021, जानेवारी, फेब्रुवारी व मार्च 2022 या चार महिन्यात अन्नधान्य वाटपाची टक्केवारी देखिल कमी दिसत आहे. राज्य संघटनेने (state organization) वारंवार विनंतीपत्र देऊन ही आपल्याकडून सकारात्मक उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे आज जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी आपआपल्या तहसिल कार्यालयात ई-पॉस मशीन जमा करत लक्ष वेधून घेतले. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास चौधरी, लक्ष्मण वाघ, शिवाजी देसले आदींसह रेशन दुकानदार उपस्थित होते.

Related Stories

No stories found.