गुजरातला जाणारा रेशनचा तांदुळ पकडला

एसडीपीओंची कारवाई, ट्रकसह 19 लाखांचा माल जप्त
गुजरातला जाणारा रेशनचा तांदुळ पकडला

धुळे । dhule। प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातून (Beed District) गुजरात राज्यात (state of Gujarat) होणारी रेशनची तस्करी रोखण्यात (Smuggling of rations) आली. शहरातील चाळीसगाव चौफुलीवर सापळा रचत (Setting a trap) ट्रकसह तांदुळ (Rice with a truck) असा एकुण 19 लाखांचा मुद्येमाल जप्त (seized) करण्यात आला. आज दुपारी नवनियुक्त सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी एस. ऋषीकेश रेड्डी यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. सलग दुसर्‍या कारवाईमुळे रेशन माफियांचे ढाबे दणाणले आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगाव ट्रकमधून (क्र.एमएच 23 डब्ब्ल्लु 3495) रेशनिंगचा तांदुळ गुजरात राज्यात नेला जात असल्याची माहिती आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एसडीपीओ एस. ऋषीकेश रेड्डी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकासह चाळीसगाव चौफुली येथे सापळा लावुन वाहनांची तपासणी सुरू केली. त्यादरम्यान संशयीत ट्रक थांबवून चालकाला ट्रकमधील मालाबाबत विचारपुस केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे ट्रकची तपासणी केली असता त्यात रेशनिंगचा तांदुळ आढळून आला.

.

गुजरातला जाणारा रेशनचा तांदुळ पकडला
दुचाकीत ड्रेसची ओढणी गेल्याने महिला ब्रेनडेड

त्यामुळे ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले. तसेच 14 लाखांचा ट्रक व 4 लाख 82 हजार 580 रुपये किंमतीचा रेशनिंगचा तांदुळ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील कारवाईसाठी मुद्येमालासह ट्रक चालकाला चाळीसगाव रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत पुरवठा निरीक्षक यांना कळविण्यात आले असुन त्यांचा तपासणी अहवाल आल्यांनतर पुढील कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे.

गुजरातला जाणारा रेशनचा तांदुळ पकडला
आमळी येथे कन्हैयालाल महाराज यात्रोत्सवास प्रारंभ

ही कारवाई पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी एस. ऋषिकेश रेड्डी, शहर वाहतुक शाखेच्या सपोनि. संगिता राऊत, पोहेकॉ आरीफ शेख, जितेंद्र आखाडे, भागवंत पाटील, सुनिल कुलकर्णी तसेच उपविभागीय कार्यालयातील पोसई राजेंद्र मांडेकर, पोहेकॉ कबीर शेख, रमेश उघडे, पोना चौरे, पोकॉ सुनिल शेंडे, चालक पाटील यांच्या पथकाने केली आहे

गुजरातला जाणारा रेशनचा तांदुळ पकडला
गौणखनिजाची अवैध वाहतूक, 9 वाहने जप्त
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com