दोंडाईचात दारूपाजून तरुणीवर बलात्कार

मित्रासह दोघांवर गुन्हा
दोंडाईचात दारूपाजून तरुणीवर बलात्कार

धुळे । Dhule । प्रतिनिधी

दोंडाईचात (Dondaicha) दारू पाजुन तरूणीवर (young woman) मित्रासह दोघांनी बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोघांवर पोलिसात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

दोंडाईचातील डालडा मिल परिसरात राहणार्‍या 24 वर्षीय तरूणीने (young woman) पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार आरिफ फारूक तांबोळी (रा. दोंडाईचा) याने तिला लग्नाचे आमिष (lure of marriage) दाखवून तिच्याशी वेळोवेळी जबरीने शारिरीक संबंध (Physical contact) केले. आरीफसह त्याचा मित्र मुस्तफा शब्बीर खाटीक या दोघांनी तरूणीच्या आई-वडीलांना जिवे मारण्याची धमकी (Death threats) दिली. तिच्यासह बहिणीची बदनामी करण्याचीही धमकी दिली.

तसेच दोघांनी तरूणीला जबरदस्तीने दारू पाजुन तिच्यावर बलात्कार (Rape) केला. ही घटना सन 2019 ते दि. 24 एप्रिल 2022 दरम्यान वेळोवेळी घडली. याप्रकणी दोघांवर भादंवि कलम 376 (1), 376 (2), (एन), 376 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस उपनिरीक्षक शरद लेंडे करीत आहेत.

Related Stories

No stories found.