लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर बलात्कार, एकावर गुन्हा

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर बलात्कार, एकावर गुन्हा

धुळे । Dhule। प्रतिनिधी

लग्नाचे आमिष (lure of marriage) दाखवून तरूणीवर (Young lady) एकाने वारंवार बलात्कार (Rape) केला. त्यातून ती गर्भवती राहिली. याप्रकरणी एकावर देवपूर पोलिसात गुन्हा दाखल (Crime in Devpur police) करण्यात आला आहे.

याबाबत देवपूरातील एकता नगरात राहणार्‍या पिडीत 28 वर्षीय तरूणीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, बिलाडी येथील सुदर्शन भरत पाटील याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यातून तरूणी गर्भवती राहिल्याने सुदर्शन पाटील याने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या.

गर्भपात झाल्याने तरूणीने सुदर्शनशी बोलणे बंद केले होते. त्यानंतर 2018 मध्ये पुन्हा सुदर्शनने फोनवरुन तिची माफी मागत पुन्हा लग्नाचे आमिष दाखविले. पुन्हा शारिरीक संबंध प्रस्तापित केले. त्यामुळे तरूणी गर्भवती झाली. मात्र, आता सुदर्शन लग्नास नकार दिला. डिसेंबर 2015 ते 7 नोव्हेंबर 2021 दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी सुदर्शन पाटीलविरोधात भादंवि 376 (2) (एन), 312 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि एस.एन.बेंद्रे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com